Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
विविध मागण्यांसाठी महापालिकेवर घरकूलच्या नागरिकांचा मोर्चा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/घरकूल.jpg)
पिंपरी- चिखली येथील घरकूल परिसरात मिशरुट न फुटलेल्या पोरांकडून दहशत माजविण्याचा प्रयत्न होत आहे. तेथील टपोरे मुलांकडून भाईगिरी करुन गाड्या फोडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाढत्या फोफावणा-या गुन्हेगारीच्या निषेधार्थ आणि विविध सोयी-सुविधांच्या मागण्यांसाठी घरकुलच्या नागरिकांनी गुरुवारी (दि.12) महापालिकेवर धडक मोर्चा काढला.
चिखली घरकुल ते पिंपरी चिंचवड महापालिका भवनापर्यंत पायी हा मोर्चा काढण्यात आला. त्यांनी प्रामुख्याने घरकुल परिसरात मागील काही दिवसांपासून गुंडगिरीमुळे दहशतीचे पसरविली जात आहे. त्याकरिता त्या भागात पोलीस चौकी तयार करावी, ती पोलीस चाैकी मध्यवर्ती ठिकाणी तातडीने सुरु करावी. तसेच, परिसरात पथदिवे बसवावेत, मिळकत कर माफ करावा, नियमित स्वच्छता करावी, अशा विविध मागण्यांसाठी घरकुल परिसरातील नागरिकांनी हा मोर्चा काढला होता. याप्रसंगी घरकुलच्या नागरिकांनी आयुक्त श्रावण हर्डीकरांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.