Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

विहिरीत पडलेल्या दुर्मीळ ब्लॅक पॅंथरच्या पिल्लाला वनविभागाने दिले जीवदान; उदय सामंतांकडून टीमचे कौतुक

चिपळूणमध्ये वनविभागाच्या रेस्क्यू पथकाचे पालकमंत्र्यांकडून अभिनंदन; महिला वनाधिकाऱ्यांच्या धाडसी नेतृत्वाचेही केले कौतुक

रत्नागिरी : विहिरीत पडलेल्या दुर्मीळ काळ्या बिबट्याच्या (ब्लॅक पॅंथर) पिल्लाला वनविभागाच्या पथकाने सुखरूप बाहेर काढत जीवदान दिले. या यशस्वी बचाव मोहिमेनंतर राज्याचे मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी चिपळूण येथील वनविभागाच्या कार्यालयाला भेट देऊन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

यावेळी नगराध्यक्ष उमेश सकपाळ, उपविभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई, सहाय्यक वन अधिकारी प्रियांका लगड यांच्यासह वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते. माध्यमांशी बोलताना पालकमंत्री डॉ. सामंत यांनी वनविभागाच्या तत्परतेचे आणि रेस्क्यू पथकाच्या कामगिरीचे विशेष कौतुक केले.

वनविभागाच्या रेस्क्यू टीमचे विशेष कौतुक

ब्लॅक पॅंथर हा अत्यंत दुर्मीळ वन्यप्राणी असून त्याचे अस्तित्व मोजक्या ठिकाणी आढळते. गेल्या तीन-चार महिन्यांत जिल्ह्यात अशा प्रकारे ब्लॅक पॅंथर आढळण्याची आणि वनविभागाने त्याला सुखरूप वाचवण्याची ही दुसरी घटना असल्याचे डॉ. सामंत यांनी सांगितले.

या कामगिरीमुळे वनविभागाची रेस्क्यू टीम संपूर्ण महाराष्ट्रात अव्वल असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. वन्यप्राण्यांच्या बचावासाठी वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी दाखवत असलेली तत्परता कौतुकास्पद असल्याचेही ते म्हणाले.

हेही वाचा –  रायगड जिल्ह्यातील जलजीवन मिशनची कामे तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री भरत गोगावले यांचे निर्देश

महिला वनाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाचे कौतुक

जिल्ह्यातील महिला वनाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना डॉ. सामंत म्हणाले की, जिल्ह्यातील दोन्ही प्रमुख वनाधिकारी महिला असून त्या अत्यंत सक्षमपणे आणि धाडसाने वन्यप्राण्यांच्या बचाव मोहिमा हाताळत आहेत. आक्रमक स्वभावाच्या वन्यप्राण्यांनाही कौशल्याने सुरक्षितपणे हाताळण्याची त्यांची क्षमता अभिमानास्पद आहे. त्यांच्या कामगिरीचे शंभर टक्के कौतुक केले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.

वन्यप्राण्याला इजा न पोहोचवता बचावकार्य

या बचाव मोहिमेदरम्यान ब्लॅक पॅंथरच्या पिल्लामुळे कोणत्याही नागरिकाला किंवा वनविभागाच्या कर्मचाऱ्याला इजा झाली नाही. तसेच वनविभागानेही त्याला कोणतीही हानी न पोहोचवता सुरक्षितपणे विहिरीतून बाहेर काढले. या कामगिरीबद्दल पालकमंत्र्यांनी संपूर्ण रेस्क्यू टीमचे आभार मानले.

या दुर्मीळ काळ्या बिबट्याच्या पिल्लाच्या बचावाची बातमी समोर आल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्येही त्याच्याबद्दल मोठे कुतूहल निर्माण झाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group