Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

आसाममध्ये भीषण अपघात; ट्रॅव्हलर आणि ट्रकच्या धडकेत २३ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश

Assam Kaziranga Accident | आसामच्या गोलाघाट जिल्ह्यातील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात शुक्रवारी एक अत्यंत भीषण रस्ते अपघात घडला आहे. पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या एका ट्रॅव्हलरची समोरून येणाऱ्या ट्रकशी जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की ट्रॅव्हलरचा अक्षरशः चुराडा झाला असून, या दुर्घटनेत २३ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याचे सांगितले जात आहे.

अपघातानंतर ट्रॅव्हलरमध्ये अनेक प्रवासी अडकून पडले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. ट्रॅव्हलरमधून मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, गंभीर जखमी झालेल्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोलाघाटचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक स्वप्ननील डेका यांनी या अपघातात २३ जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र, अपघातग्रस्त वाहनातून नेमके किती प्रवासी प्रवास करत होते, याची निश्चित माहिती अद्याप समजू शकलेली नाही.

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी व्यक्त केला शोक

या हृदयद्रावक घटनेवर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (ट्विटर) पोस्ट शेअर करत तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, “काझीरंगा येथे झालेल्या अपघाताच्या वृत्ताने मन अत्यंत व्यथित झाले आहे. या दुर्घटनेत बळी पडलेल्यांची संख्या ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. ज्या कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्या दुःखात मी आणि संपूर्ण राज्य सहभागी आहे. कोणत्याही शब्दांनी हे दुःख कमी होणार नाही, पण या कठीण प्रसंगी संपूर्ण आसाम राज्य त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.”

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group