ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मराठा सेवा संघाचे सुरेश पाटील राज्यस्तरीय ‘समाजरत्न’ पुरस्काराने सन्मानित

पंढरपुरात गौरव, महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषदेकडून सामाजिक कार्याची दखल

पंढरपूर | मराठा सेवा संघाचे क्रियाशील कार्याध्यक्ष सुरेश किसन पाटील यांना राज्यस्तरीय ‘समाजरत्न नागरी पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषद, महाराष्ट्र यांच्या वतीने पंढरपूर येथे आयोजित १६व्या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत पाटील यांचा गौरव करण्यात आला.

पाटील यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेऊन शिक्षक परिषदेने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली होती. परिषदेचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव यांच्या स्वाक्षरीने ८ ऑक्टोबर २०२६ रोजी त्यांना निवडपत्र देण्यात आले होते. पुरस्कार निवड समितीत परिषदेच्या प्रदेश आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

हेही वाचा

PCMC । स्वीकृत नगरसेवक निवडीचा दहा महिन्यांचा तिढा सुटणार? २० नोव्हेंबरच्या सभेकडे लक्ष!

शनिवार, १४ नोव्हेंबर रोजी पंढरपूर (जि. सोलापूर) येथील पुणे रोडवरील श्रीराम मंगल कार्यालयात पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. सोहळ्यास महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषदेचे प्रदेश मुख्य संघटक मनोजकुमार रणदिवे आणि नाशिकचे प्रदेश संघटक माधव भुजाडे उपस्थित होते.

सुरेश पाटील हे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात मराठा सेवा संघाचे क्रियाशील कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. राष्ट्रीय खेळाडू आणि महावितरणच्या सेवेतून निवृत्त झालेले आहेत. पुनावळे, पिंपरी-चिंचवड, पुणे येथील डी. एस. के. कुंजबन सोसायटीचे उपाध्यक्ष संजय पाटील यांचे ते वडील आहेत.

“माझ्या सामाजिक कार्याची दखल घेतल्याबद्दल महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषदेचा मी आभारी आहे. मराठा सेवा संघातील सहकाऱ्यांची साथ आणि कुटुंबाचा पाठिंबा या वाटचालीत मोलाचा ठरला. हा सन्मान मी त्या सर्वांसोबत वाटून घेतो. समाजासाठी अधिक जबाबदारीने काम करण्याचं बळ या पुरस्कारातून मिळालं आहे.”

– सुरेश पाटील, कार्याध्यक्ष, मराठा सेवा संघ, जळगाव.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group