Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

भारत-न्यूझीलंड पहिला सामना ऑकलँडमध्ये; रोहित-विराटचे पुनरागमन, कुठे आणि कसा पाहाल सामना?

IND vs NZ | न्यूझीलंडविरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका ३-२ अशा फरकाने खिशात घातल्यानंतर भारतीय संघ आता एकदिवसीय (ODI) मालिकेसाठी सज्ज झाला आहे. शेवटच्या दोन टी-२० सामन्यांत यजमान न्यूझीलंडने जोरदार पुनरागमन केले असले, तरी वनडेत भारताचे पारडे अधिक जड मानले जात आहे. या मालिकेनिमित्त भारतीय संघाचे प्रमुख शिलेदार रोहित शर्मा आणि विराट कोहली संघात परतले असून, कर्णधार शुबमन गिलही उत्तम फॉर्ममध्ये आहे. दुसरीकडे, डेव्हॉन कॉनवे दुखापतीमुळे पहिल्या सामन्यातून बाहेर पडल्याने आणि रचिन रवींद्र व मार्क चॅपमन आधीच अनुपलब्ध असल्याने न्यूझीलंडच्या अडचणी वाढल्या आहेत.

पहिला वनडे सामना बुधवार, ४ नोव्हेंबर रोजी ऑकलँडमधील ईडन पार्कच्या मैदानावर खेळवला जाणार असून, भारतीय वेळेनुसार सकाळी ७:०० वाजता नाणेफेक आणि सकाळी ७:३० वाजता सामन्याला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे; तसेच या सामन्याचे थेट प्रक्षेपण प्रेक्षकांना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर पाहता येईल, तर ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीमिंग सोनी लिव (SonyLIV) ॲप आणि वेबसाईटवर उपलब्ध असेल.

हेही वाचा

शगुन चौक,पिंपरी येथील पूजा साहित्याच्या दुकानांना मध्यरात्री लागली आग; अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला

वनडे मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ :

सुरुवातीच्या ३ सामन्यांसाठी संघ: शुबमन गिल (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, नमन धीर, अंशुल कंबोज, गुरनूर ब्रार, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंग, इशान किशन (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज, आकिब नबी आणि कुलदीप यादव.

अखेरच्या २ सामन्यांसाठी संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), इशान किशन (उपकर्णधार व यष्टीरक्षक), रोहित शर्मा, विराट कोहली, तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, नमन धीर, आकिब नबी, गुरनूर ब्रार, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंग, कुमार कुशाग्र (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज, यश ठाकूर आणि कुलदीप यादव.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group