Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

‘महादेव’ बेटिंग रॅकेटचा मुख्य सूत्रधार सौरभ चंद्रकर अखेर भारताच्या ताब्यात; ओमानमधून प्रत्यार्पण

Mahadev betting app kingpin Saurabh Chandrakar | बेकायदेशीर ऑनलाइन सट्टेबाजीच्या माध्यमातून तब्बल ६ हजार कोटी रुपयांची अफरातफर करणाऱ्या कुख्यात ‘महादेव’ बेटिंग ॲपचा मुख्य म्होरक्या सौरभ चंद्रकर अखेर भारतीय तपास यंत्रणांच्या जाळ्यात अडकला आहे. गेल्या ७ वर्षांपासून सीबीआय (CBI), ईडी (ED) आणि इंटरपोलच्या ‘मोस्ट वाँटेड’ यादीत असलेल्या सौरभ चंद्रकरचे ओमानमधून भारतात यशस्वीरीत्या प्रत्यार्पण करण्यात आले आहे. सीबीआयच्या एका विशेष पथकाने ओमानची राजधानी मस्कट येथे जाऊन त्याचा ताबा घेतला असून, त्याला छत्तीसगडमधील रायपूर येथील विशेष सीबीआय न्यायालयात हजर केले जाणार आहे.

सौरभ चंद्रकरने त्याचा साथीदार रवी उप्पल याच्यासोबत मिळून ‘महादेव ऑनलाइन बुक’ हे बेकायदेशीर बेटिंग ॲप सुरू केले होते. घोटाळा उघडकीस आल्यानंतर २०१९ च्या सुमारास दोघेही दुबईला पळून गेले होते.

  • यूएईमधील नजरकैद: इंटरपोलने जारी केलेल्या रेड कॉर्नर नोटीसनंतर ऑक्टोबर २०२४ मध्ये यूएई पोलिसांनी सौरभला हाऊस अरेस्ट केले होते. भारताने त्यावेळी त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती; मात्र कायदेशीर गुंतागुंतीमुळे ते शक्य झाले नव्हते.
  • ओमान पोलिसांची धडक कारवाई: यूएईमधून त्याचा साथीदार रवी उप्पल ओमानला पसार झाला आणि त्यानंतर सौरभ चंद्रकरही मस्कटमध्ये लपून बसला. गुप्त माहितीच्या आधारे ओमान पोलिसांनी जून महिन्यात त्याला ताब्यात घेतले.

हेही वाचा

अमेरिकेत भीषण विमान अपघात; रस्त्यावर खासगी विमान कोसळताच स्फोट, ९ जणांचा होरपळून मृत्यू

ओमान प्रशासनाची तातडीने कारवाई; प्रत्यार्पण पूर्ण

सीबीआय आणि ईडीने इंटरपोल नॅशनल सेंट्रल ब्युरो (NCB) च्या माध्यमातून ओमान सरकारकडे सौरभच्या प्रत्यार्पणाचा प्रस्ताव सादर केला होता. ओमान प्रशासनाने भारताच्या या विनंतीला तातडीने मान्यता देत प्रत्यार्पणाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. प्रत्यार्पण मंजूर होताच सीबीआयचे पथक मस्कटला रवाना झाले आणि त्यांनी सौरभ चंद्रकरला बेड्या ठोकून भारतात आणले.

दुसरा म्होरक्या रवी उप्पल अद्याप फरार

या घोटाळ्यातील दुसरा मुख्य भागीदार रवी उप्पल हा अद्याप फरार आहे. ओमान पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जात असून, त्याचा ठावठिकाणा लागताच त्याच्याही प्रत्यार्पणाची कारवाई केली जाईल, यासाठी सीबीआयने आधीच आवश्यक प्रस्ताव सादर केला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group