Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

१० ऑक्टोबरला ‘जेन झी’चा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी ‘CJP’ आक्रमक!

नवी दिल्ली | मतदार यादीतील कथित गैरप्रकारांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरील विरोधकांचा दबाव दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. १० ऑक्टोबर रोजी देशभरात होणाऱ्या तरुण आणि ‘जेन झी’च्या (Gen Z) देशव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी ज्ञानेश कुमार यांच्या तात्काळ राजीनाम्याची आक्रमक मागणी केली आहे. “जोपर्यंत ज्ञानेश कुमार पदावरून पायउतार होत नाहीत, तोपर्यंत देशातील तरुण मागे हटणार नाहीत,” असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.

पत्रकारांशी बोलताना सौरव दास म्हणाले, “१० ऑक्टोबरपासून देशात तरुणांची अभूतपूर्व ताकद आणि एकजूट पाहायला मिळेल. जरी या आंदोलनाची हाक कॉक्रोच जनता पार्टीने दिली असली, तरी हे आंदोलन संपूर्णपणे देशातील तरुण आणि जेन झी पिढीचे आहे. व्यवस्थेतील सुधारणा आणि परिस्थितीतील खरा बदल केवळ मतदानाच्या अधिकारातूनच घडू शकतो, याची स्पष्ट जाणीव आजच्या तरुण पिढीला आहे.”

हेही वाचा

हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा; भुवनेश्वर कुमारकडे कर्णधारपद

निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींवर बोट ठेवताना त्यांनी यंत्रणेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “सध्याची व्यवस्था इतकी ढासळली आहे की, नागरिक मतदानासाठी केंद्रावर पोहोचतात तेव्हा मतदार यादीतून त्यांचे नावच गायब झालेले असते. जर सत्ताधाऱ्यांनी अशी यंत्रणा तयार केली असेल, तर तरुणांनी न्याय मागायचा कोणाकडे? या व्यवस्थेतून बेरोजगारीसारख्या भीषण समस्येवर तोडगा कसा निघणार?” असा संतप्त सवाल उपस्थित करत त्यांनी ज्ञानेश कुमार यांनी तत्काळ पद सोडावे, अशी मागणी केली.

आरोपांवर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

दुसरीकडे, निवडणूक आयोगाने राहुल गांधी आणि विरोधकांचे हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हे आरोप दिशाभूल करणारे असल्याचे सांगत आयोगाने स्पष्ट केले की, “बिहारमध्ये २४ जून २०२५ रोजी लागू करण्यात आलेला ‘एसआयआर’चा (SIR) आदेश पूर्ण आयोगाच्या एकमुखाने घेतलेल्या निर्णयानुसार जारी करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयानेही २७ मे २०२६ च्या आपल्या निकालात या आदेशाची वैधता कायम ठेवली आहे.”

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी आणि १० ऑक्टोबरचा आंदोलनाचा इशारा यामुळे आगामी काळात निवडणूक आयोग विरुद्ध विरोधक हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group