TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिंधुदुर्गात भातपिकाच्या नुकसानीचा पालकमंत्र्यांकडून आढावा; बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदतीच्या सूचना

सावंतवाडी, वेंगुर्ला, वैभववाडीतील नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती संकलित करण्याचे निर्देश; विकासकामांचाही घेतला आढावा

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात काही भागांत पावसाने घेतलेल्या खंडामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा तसेच भातपिकाच्या नुकसानीचा पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. काही ठिकाणी भातपीक करपल्याच्या घटना निदर्शनास आल्याने बाधित शेतकऱ्यांना आवश्यक मदत आणि उपाययोजना उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

या बैठकीला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले, कृषी उपसंचालक ज्ञानेश्वर बढे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सावंतवाडी, वेंगुर्ला आणि वैभववाडी तालुक्यांत भातपिकाच्या नुकसानीची प्रकरणे प्रशासनाकडे प्राप्त झाली आहेत. या नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती संकलित करून बाधित क्षेत्राची स्थिती स्पष्ट करावी आणि त्यानुसार आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करावे, यावर बैठकीत भर देण्यात आला.

हेही वाचा –  नाशिकच्या प्रशिक्षण शिबिरानंतर सपकाळांच्या नेतृत्वाची चर्चा; काँग्रेसमधील संघटनात्मक आव्हाने कायम

दरम्यान, जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांसह जिल्हा वार्षिक योजनेतील कामांचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. उपलब्ध निधीचा प्रभावी आणि वेळेत विनियोग करण्यासोबतच विकासकामांची गुणवत्ता कायम राखण्यासाठी संबंधित यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.

विकासकामांच्या अंमलबजावणीचा नियमित आढावा घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. दर आठवड्याला संबंधित अंमलबजावणी यंत्रणांच्या कामकाजाचा आढावा जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group