Asian Games 2026: भारत-जपान ऐतिहासिक लढत ‘या’ दिवशी, जाणून घ्या वेळ आणि संपूर्ण संघ

IND vs JPN | जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये आता भारतीय पुरुष क्रिकेट संघ सुवर्णपदकावर आपले नाव कोरण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय महिला संघाने आधीच अंतिम फेरीत धडक मारून पदक निश्चित केल्यानंतर, आता सर्वांच्या नजरा श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पुरुष संघाच्या कामगिरीकडे लागल्या आहेत. चांगल्या रँकिंगमुळे थेट उपांत्यपूर्व फेरीत (क्वार्टर फायनल) प्रवेश मिळवणाऱ्या भारतीय संघाचा सामना यजमान जपानविरुद्ध रंगणार असून, दोन्ही संघांमधील हा पहिलाच आंतरराष्ट्रीय टी-२० सामना असल्याने या लढतीला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
भारत आणि जपान क्रिकेटच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय पातळीवर आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ आहे. हा ऐतिहासिक सामना मंगळवार, २२ सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी ९:३० वाजता सामन्याला सुरुवात होईल. नाणेफेक (Toss): सामना सुरू होण्याच्या अर्धा तास आधी, म्हणजेच सकाळी ९:०० वाजता नाणेफेक होईल. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी साधारण १:०० वाजेपर्यंत चालण्याची शक्यता आहे.
हेही वाचा
उत्तर प्रदेशची ४ भागांत विभागणी होणार; मंत्री ओमप्रकाश राजभर यांचा खळबळजनक दावा
अनुभवी आणि युवा खेळाडूंचा भरणा असलेला भारतीय संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार मानला जात असून, या ऐतिहासिक लढतीत टीम इंडियाच्या कामगिरीकडे तमाम क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पुरुष संघ:
श्रेयस अय्यर (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, शिवम दुबे, इशान किशन, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, यश ठाकूर, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, विप्रज निगम, वैभव सूर्यवंशी.





