TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डीजेचा वापर घटला, कृत्रिम तलावांकडे वाढला कल; पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबद्दल MPCB चे कौतुक

ध्वनिप्रदूषणात घट; शाडूच्या मूर्ती आणि थर्माकॉलमुक्त उत्सवाला ५० टक्क्यांहून अधिक प्रतिसाद

मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने सण साजरा करण्याकडे नागरिकांचा कल वाढल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (MPCB) अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी गणेशोत्सवादरम्यान झालेल्या या सकारात्मक बदलांचे कौतुक केले. यंदा डीजेचा वापर लक्षणीयरीत्या कमी झाल्याने ध्वनिप्रदूषणात घट झाली असून, नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

गणेशमूर्ती विसर्जनासाठी अनेक ठिकाणी कृत्रिम तलावांचा वापर वाढला आहे. महानगरपालिकांकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या मोफत कृत्रिम तलावांच्या सुविधेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे कदम यांनी नमूद केले. त्यामुळे नैसर्गिक जलस्रोतांवरील विसर्जनाचा ताण कमी करण्यास मदत होत आहे.

शाडूच्या मूर्तींना प्रोत्साहन

थर्माकॉलचा वापर टाळणे, शाडूच्या मातीच्या मूर्तींना प्रोत्साहन देणे यांसह MPCB कडून करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक उपाययोजनांचे ५० टक्क्यांहून अधिक पालन होत असल्याचे सिद्धेश कदम यांनी सांगितले. नागरिकांचा वाढता सहभाग पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा –  नाशिकमध्ये शिवसेनेची संघटनबांधणीसाठी नवी रणनीती; १३ तालुकाप्रमुखांना नव्या गाड्या

सर्वच सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करण्याचे आवाहन

केवळ गणेशोत्सवापुरतेच पर्यावरण संवर्धन मर्यादित न ठेवता नवरात्री, दिवाळी, ईद आणि मोहरम यांसारखे सर्व सण पारंपरिक आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करण्याचे आवाहन कदम यांनी केले.

हवा, पाणी आणि ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. पर्यावरणपूरक सण साजरा करण्याची जबाबदारी केवळ प्रशासनाची नसून, प्रत्येक नागरिकाच्या सहभागातूनच प्रदूषणमुक्त सणांचे उद्दिष्ट साध्य होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button