Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

“आम्ही निर्णायक टप्प्यावर”; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा, न्यूयॉर्कमध्ये संभाव्य भेटीचे संकेत

Donald Trump | अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत मोठे आणि आक्रमक विधान केले आहे. इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षाबाबत अमेरिका आता “निर्णायक टप्प्यावर” पोहोचली असून, इराणने आपली भूमिका बदलली नाही तर भविष्यात “खूप मोठ्या घडामोडी” घडू शकतात, असा थेट इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला असून युद्ध अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दुसरीकडे, इराणने युद्ध रोखण्यासाठी अमेरिकेशी पुन्हा वाटाघाटी करण्याची तयारी दर्शवली असून कतारमार्फत आपल्या अटी वॉशिंग्टनकडे पाठवल्या आहेत. यामध्ये चालू लष्करी कारवाई तात्काळ थांबवणे, अमेरिकेने गोठवलेला इराणचा निधी खुला करणे आणि आर्थिक नाकेबंदी उठवणे या प्रमुख अटींचा समावेश असल्याचे इराणकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा

तुकाराम मुंढेंच्या बदलीच्या चर्चेवर अखेर मौन सोडले; म्हणाले, ‘सरकार जो विभाग देईल, तिथे काम करेन’

फॉक्स न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत ट्रम्प यांनी आपण सध्या “निर्णयाच्या मोडमध्ये” असल्याचे स्पष्ट केले. “इराणच्या सत्ताधाऱ्यांनी योग्य भूमिका घेतली नाही तर त्याचे मोठे परिणाम भोगावे लागतील. त्यांनी नीट वागले पाहिजे,” असे ट्रम्प म्हणाले. यावेळी युद्धाबाबत ट्रम्प यांच्यासमोर तीन मुख्य पर्याय असल्याचे समोर आले आहे: थेट लष्करी कारवाईद्वारे इराणच्या लष्करी आणि सामरिक ठिकाणांचा पूर्णपणे नायनाट करणे, आर्थिक निर्बंध अधिक कडक करून इराणची अर्थव्यवस्था खिळखिळी करणे, किंवा मुत्सद्दी चर्चेतून अटींनुसार करार करून संघर्षावर तोडगा काढणे.

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत पेझेश्कियन-ट्रम्प भेट होणार?

दरम्यान, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन संयुक्त राष्ट्रांच्या (UN) महासभेसाठी न्यूयॉर्क दौऱ्यावर येत आहेत. अमेरिकेने इराणच्या मुख्य शिष्टमंडळाला यासाठी अधिकृत परवानगी दिली आहे. या दौऱ्यादरम्यान पेझेश्कियन यांची भेट घेणार का, असा प्रश्न विचारला असता ट्रम्प यांनी अशा संभाव्य भेटीसाठी आपण “बहुधा तयार” असल्याचे सूचक संकेत दिले आहेत. त्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या व्यासपीठावर दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये ऐतिहासिक भेट होणार का, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button