पुणेताज्या घडामोडी

अजितदादांच्या विकासकार्याला गणेशोत्सवातून अनोखी मानवंदना

प्रा.हरिहर चौरे यांच्या निवासस्थानी विकासकामांचे मॉडेलरूपी आकर्षक गणपती देखावा

देहू : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विविध विकासकामांचे दर्शन घडविणारा आकर्षक मॉडेलरूपी गणपती देखावा श्री. हरिहर मुरलीधर चौरे(सर) यांच्या देहूगाव निवासस्थानी साकारण्यात आला आहे.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने साकारलेल्या या देखाव्यामध्ये श्रीगणेशाच्या मूर्तीसमवेत अजितदादा पवार यांच्या छायाचित्रांचा समावेश करण्यात आला असून, “अजितदादा सदैव स्मरणात… कामाचा माणूस” या भावनेतून त्यांच्या कार्याची आठवण करून देण्यात आली आहे.

अजितदादा पवार यांनी सार्वजनिक जीवनात विविध जबाबदाऱ्या सांभाळताना विकासकामे, पायाभूत सुविधा, शिक्षण, शेती व सहकार, सिंचन व जलसंधारण, आरोग्य, आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी संबंधित कामांवर भर दिला. त्यांच्या कार्याची आठवण पुढील पिढीपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने श्री. हरिहर चौरे व सौ.अश्विनी चौरे यांच्या कुटुंबीयांनी हा देखावा साकारला आहे.

हेही वाचा –  तुकाराम मुंढेंच्या बदलीच्या चर्चेवर अखेर मौन सोडले; म्हणाले, ‘सरकार जो विभाग देईल, तिथे काम करेन’

गणेशमूर्ती, आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट आणि अजितदादांच्या कार्याची झलक देणारे मॉडेल यामुळे हा देखावा परिसरातील नागरिकांचे आणि गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहे.

“अजितदादांनी केलेल्या विकासकामांची आठवण कायम राहावी आणि त्यांच्या कार्याला भावपूर्ण आदरांजली अर्पण व्हावी, या उद्देशाने हा देखावा साकारण्यात आला आहे,” अशी भावना प्रा. हरिहर चौरे यांनी व्यक्त केली.

अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे विमान अपघातात निधन झाले होते. त्यांच्या स्मृतींना उजाळा देणारा हा गणेशोत्सवातील उपक्रम सामाजिक आणि भावनिक संदेश देणारा ठरत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group