TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जरांगे पाटीलांच्या उपोषणाचा आठवा दिवस; सरकारच्या हालचालींना वेग

SEBC प्रमाणपत्रांच्या वाटपाची महिनानिहाय आणि जिल्हानिहाय आकडेवारी मागवली; मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तातडीचे निर्देश

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण आठव्या दिवशीही सुरू असून त्यांची प्रकृती खालावली आहे. दोन दिवसांपूर्वी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन सरकार त्यांच्या मागण्या मान्य करण्यास सकारात्मक असल्याचे सांगितले होते. तसेच उपोषण मागे घेण्याची विनंतीही त्यांनी केली होती. मात्र, हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप सुरू झाल्यानंतरच उपोषण मागे घेण्याची भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे.

प्रसाद लाड यांच्या आश्वासनानंतर जरांगे पाटील यांनी पाणी घेतले होते तसेच सलाईन लावण्याची तयारी दर्शवली होती. त्यांनी सरकारला दोन दिवसांची मुदतही दिली होती. यापूर्वी अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळानेही त्यांची भेट घेऊन मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, उपोषण अद्याप सुरूच आहे.

हेही वाचा –  ऊसदरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकातील शेतकरी आक्रमक; २९ सप्टेंबरपासून हुबळीत बेमुदत धरणे आंदोलन

SEBC प्रमाणपत्रांच्या आकडेवारीचे आदेश

दरम्यान, जरांगे पाटील यांच्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर सरकार दरबारी हालचालींना वेग आल्याचे दिसून येत आहे. शिष्टमंडळाच्या भेटीनंतर SEBC प्रमाणपत्र वाटपाची महिनानिहाय आणि जिल्हानिहाय माहिती सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाने मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत तातडीने माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. जानेवारी २०२३ पासून आतापर्यंत मराठा समाजाला वितरित करण्यात आलेल्या १० टक्के SEBC आरक्षणाच्या प्रमाणपत्रांची जिल्हानिहाय आणि महिनानिहाय आकडेवारी मागवण्यात आली आहे.

मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षांच्या आदेशानंतर सह आयुक्त (सामान्य प्रशासन) मंजुषा मिसकर यांनी ही एकत्रित माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष

एकीकडे जरांगे पाटील उपोषणावर ठाम असताना दुसरीकडे सरकारकडून SEBC प्रमाणपत्रांच्या वाटपाची माहिती संकलित करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आगामी काळात सरकारकडून मराठा आरक्षणाच्या मागण्यांबाबत कोणता निर्णय घेतला जातो आणि त्यावर जरांगे पाटील काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button