TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

“भाजपवाले जसे लोक फोडतात, तसे शिक्षकांनी इंग्रजी शाळांमधील विद्यार्थी फोडावेत”; गुलाबराव पाटलांचा अजब सल्ला

मराठी शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षकांनी इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील विद्यार्थी आणावेत; शिक्षकदिनाच्या कार्यक्रमातील वक्तव्याची जोरदार चर्चा

Gulabrao Patil : शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या एका वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. जळगावमध्ये शिक्षकदिनानिमित्त आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात बोलताना त्यांनी शिक्षकांना थेट विद्यार्थ्यांची ‘फोडाफोडी’ करण्याचा सल्ला दिला. मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थी मराठी शाळांकडे आणावेत, असे ते म्हणाले.

‘भाजपवाले जसे लोक फोडतात, तसे शिक्षकांनी विद्यार्थी फोडावेत’

गुलाबराव पाटील म्हणाले, “ज्या पद्धतीने भाजपवाले आमचे लोक फोडतात, पक्ष फोडतात, या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात असं सगळं करतात, त्याच पद्धतीने मराठी शाळांमधली विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी म्हणून शिक्षकांनीदेखील इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थी फोडले पाहिजेत.”

जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर कार्यक्रमात उपस्थितांमध्ये हशा पिकला.

हेही वाचा –  मराठा आंदोलकांनी गोपीचंद पडळकरांचा ताफा अडवला; आरक्षणावर आमदारांनी जाहीर केली भूमिका

‘हम दो हमारे दो आणि इंग्लिश में जाने दो’

मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या टिकवणे हे मोठे आव्हान बनले असल्याचेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले. कुटुंब नियोजनाच्या बदललेल्या पद्धतीचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला. “हम दो हमारे दो आणि इंग्लिश में जाने दो हा मोठा कार्यक्रम बनला आहे,” असे पाटील म्हणाले.

इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्येही स्पर्धा

सरकारी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये स्पर्धा असल्याचे सांगतानाच, आता खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्येही मोठी स्पर्धा निर्माण झाली असल्याचे गुलाबराव पाटील यांनी नमूद केले.

मराठी शाळांची पटसंख्या टिकवणे आणि वाढवणे हे शिक्षण व्यवस्थेसमोरील आव्हान असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिक्षकांना हा मिश्कील सल्ला दिला. मात्र, भाजपच्या राजकारणाशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची तुलना केल्याने त्यांच्या या वक्तव्यावरून आता राजकीय आणि सामाजिक चर्चेला सुरुवात झाली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group