ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

श्री सायाजीनाथ महाराज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती सत्र उत्साहात संपन्न

आळंदी, पुणे | डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि त्यासोबत वाढणारे सायबर धोके लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना सुरक्षित डिजिटल वापराबाबत जागरूक करण्याच्या उद्देशाने श्री सायाजीनाथ महाराज इंग्लिश मीडियम स्कूल, वडमुखवाडी, आळंदी, पुणे येथे सायबर सुरक्षा जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले.

क्विक हील फाउंडेशन यांच्या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या अभियानांतर्गत आयोजित या उपक्रमाचा मुख्य उद्देश ‘भारताला जागरूक आणि सुरक्षित बनविणे’ हा होता. विद्यार्थ्यांनी इंटरनेट, मोबाईल आणि समाजमाध्यमांचा वापर करताना आवश्यक काळजी घ्यावी, वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवावी आणि सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

सत्रामध्ये विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेच्या मूलभूत संकल्पना, ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, बनावट लिंक व संदेश, ओटीपी सुरक्षितता, मजबूत संकेतशब्द, समाजमाध्यमांची गोपनीयता, डिजिटल पाऊलखुणा, मोबाईल ॲप्सचा सुरक्षित वापर आणि वैयक्तिक माहितीचे संरक्षण याबाबत माहिती देण्यात आली. प्रत्यक्ष उदाहरणे आणि प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सायबर धोके ओळखण्याचे तसेच त्यापासून सुरक्षित राहण्याचे उपाय समजावून सांगण्यात आले.

सायबर फसवणूक झाल्यास घाबरून न जाता त्वरित राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाईन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा तसेच अधिकृत सायबर गुन्हे तक्रार नोंदणी संकेतस्थळावर तक्रार दाखल करावी, याबाबतही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

हेही वाचा

RKL Galaxy स्कूलची लोहेगाव फुटबॉल स्पर्धेत उत्तुंग कामगिरी; U11 संघ चॅम्पियन

या जनजागृती सत्राचे मार्गदर्शन एमआयटी एसीएससी, आळंदी येथील सायबर वॉरियर टीममधील खालील सदस्यांनी केले :

हर्षल वाल्हे – सायबर वॉरियर
अंकुश चव्हाण – सायबर वॉरियर

दोन्ही सायबर वॉरियर्सनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत दैनंदिन जीवनातील उदाहरणांच्या माध्यमातून सुरक्षित डिजिटल सवयी आणि सायबर धोक्यांपासून बचाव करण्याच्या पद्धती समजावून सांगितल्या. या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ. सुषमा अग्रवाल मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

हा उपक्रम एमआयटी एसीएससी, आळंदी यांच्या सहकार्याने राबविण्यात आला. क्विक हील फाउंडेशनच्या अध्यक्षा मा. सौ. अनुपमा काटकर मॅडम यांच्या प्रेरणेतून तसेच एमआयटी एसीएससी, आळंदीचे प्राध्यापक समन्वयक (फॅकल्टी कोऑर्डिनेटर) मा. श्री. अमित तळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सुरक्षा जनजागृती अभियान विविध शाळांमध्ये राबविण्यात येत आहे.

या अभियानाचा संदेश ‘माझा डेटा, माझी जबाबदारी’ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला. विद्यार्थ्यांनी सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सुरक्षित इंटरनेट वापरणे, वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणे आणि कोणतीही संशयास्पद ऑनलाइन घटना घडल्यास पालक किंवा शिक्षकांची मदत घेण्याचा निर्धार व्यक्त केला.

जागरूक विद्यार्थी, सुरक्षित डिजिटल भविष्य आणि सुरक्षित भारत या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले हे सत्र विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group