ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

वाघेश्वर विद्यालय, चऱ्होली येथे इयत्ता ११ वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती सत्राचे आयोजन

चऱ्होली, पुणे | Quick Heal Foundation यांच्या “सायबर शिक्षण फॉर सायबर सुरक्षा” या राष्ट्रीय अभियानांतर्गत एमआयटी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज (एमआयटी एसीएससी), आळंदी यांच्या सहकार्याने वाघेश्वर विद्यालय, चऱ्होली येथे इयत्ता ११ वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती सत्राचे यशस्वी आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम ०५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८.०० ते १०.०० या वेळेत पार पडला.

“सायबर शिक्षण फॉर सायबर सुरक्षा – सुरक्षित डिजिटल भविष्यासाठी विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण” या ब्रीदवाक्याखाली आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना वाढत्या सायबर धोक्यांविषयी जागरूक करणे, सुरक्षित इंटरनेट वापराच्या सवयी विकसित करणे आणि जबाबदार डिजिटल नागरिक घडविणे हा होता.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना सायबर फसवणूक, फिशिंग, सोशल मीडिया सुरक्षितता, मजबूत पासवर्डचे महत्त्व, ओटीपी, यूपीआय व क्यूआर कोड फसवणूक, ऑनलाइन गेमिंगचे धोके, डिजिटल फूटप्रिंट, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून तयार होणारे डीपफेक, बनावट बातम्या तसेच राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन क्रमांक १९३० आणि राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टल यांचा वापर करून सायबर गुन्ह्यांची तक्रार कशी नोंदवावी, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

हेही वाचा

श्री सायाजीनाथ महाराज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती सत्र उत्साहात संपन्न

प्रत्यक्ष उदाहरणे, संवादात्मक चर्चा आणि प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाय समजावून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सुरक्षित डिजिटल सवयी अंगीकारण्याचा संकल्प व्यक्त केला.हा उपक्रम श्री. चव्हाण सर, मुख्याध्यापक यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडला.

हे सत्र एमआयटी एसीएससी, आळंदी येथील सायबर योद्धा पथकातील खालील सदस्यांनी घेतले :

यश वडाणे – सायबर योद्धा
मोनिका पवार – सायबर योद्धा

या उपक्रमाची अंमलबजावणी एमआयटी एसीएससी, आळंदी येथील प्राध्यापक समन्वयक मा. श्री. अमित तळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच क्विक हील फाउंडेशनच्या अध्यक्षा मा. सौ. अनुपमा काटकर मॅडम आणि सहयोगी संचालक मा. श्री. अजय शिर्के सर यांच्या प्रेरणेतून देशभरात सायबर सुरक्षा जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी शाळा प्रशासनाने सायबर योद्धा पथकाचे आभार मानले. विद्यार्थ्यांनी “माझा डेटा, माझी जबाबदारी” हा संदेश स्वीकारत सुरक्षित, सजग आणि जबाबदार डिजिटल नागरिक बनण्याचा निर्धार व्यक्त केला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button