Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला; “अनेकांना वाटलं होतं आपण शेतकरी कर्जमाफी करणार नाही; आंदोलन करु आणि..”

Devendra Fadnavis : ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर केल्याबद्दल भाजपा किसान मोर्चातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यांमधील शेतकऱ्यांना उद्देशून आपलं मनोगत व्यक्त केलं. यावेळी त्यांनी विरोधकांनाही टोला लगावला. कर्जमाफी होणार नाही असं काहींना वाटलं होतं पण हे शेतकऱ्यांच्या देवाभाऊचं सरकार आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मी आयुष्यात खूप कमी सत्कार स्वीकारतो. सत्कारांपासून दूर राहतो. पण किसान मोर्चाने जेव्हा सत्कार करणार आहोत हे सांगितलं तेव्हा मला यात संधी दिसली की या निमित्ताने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांशी संवाद करता येईल. दोन गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहचवता येतील म्हणून मी सत्कार स्वीकारला. मुंबईला हा कार्यक्रम घ्यायचा आहे असं त्यांनी मला सांगितलं. मी त्यांना म्हटलं की तुमच्या विभागात घ्या. पण मला हे सांगण्यात आलं की मुंबई राज्याची राजधानी आहे आम्हाला तिथेच येऊन तुमचा सत्कार स्वीकारायचा आहे. मी दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजेच एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या वतीने आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या वतीने हा सत्कार मी स्वीकारतो असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा –  सलग तिसऱ्या दिवशी सोनं स्वस्त; चांदीतही घसरण

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, खरंतर पहिल्यांदाच असं घडलं असेल की कर्जमाफीचा निर्णय कुठलीही निवडणूक डोळ्यांसमोर नसताना घेण्यात आला. मागच्या निवडणुकीत आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन आपण दिलं होतं. त्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात आपल्याला चांगलं यश मिळालं. जिल्हा परिषद, महापालिका, नगर परिषदा या सगळ्या निवडणुकांमध्ये भाजपा आणि महायुतीला भरभरुन यश मिळालं. केवळ राजकीय विचार केला असता तर समोर कुठलीही निवडणूक उरलेली नाही त्यामुळे २०२९ ला लोकांसमोर जायचं आहे त्यामुळे जानेवारी २०२९ मध्ये कर्जमाफी करु अशा प्रकारचा राजकीय विचार करता आला असता. पण कर्जमाफी असेल, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय असतील हे निर्णय राजकारणाशी संबंधित नाही. शेतकऱ्याचं हित बघत असताना कुठल्याही गोष्टींमध्ये शेतकऱ्यांसाठी कुठला निर्णय घ्यायचा हे महत्त्वाचं असतं. खरंतर अनेक लोकांना असं वाटत होतं की सरकार कर्जमाफी करणार नाही. मग आपण आंदोलनं करु, आपलं दुकान चालू राहिल, प्रसिद्धी मिळत राहिल. पण त्यांना हे माहीत नव्हतं की हे महायुतीचं सरकार आहे आणि शेतकऱ्यांच्या देवाभाऊचं सरकार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

आपण कर्जमाफीचा निर्णय घेतला, दोन लाखांपर्यंत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचसोबत ज्यांनी नियमित कर्ज भरलं आहे त्यांना ५० हजार रुपये देण्याचा निर्णय आपण घेतला. हा निर्णय घेतल्यानंतर आपण एक अट टाकली होती ती अशी होती की २०१९ च्या कर्जमाफीमध्ये ज्यांना त्याचा फायदा मिळाला आहे त्यांना या योजनेचा मिळणार नाही. राज्यात २००८ मध्ये देशातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली. २००९ मध्ये महाराष्ट्रात कर्जमाफी झाली. त्यावेळच्या सरकारने २००८ मध्ये ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता त्यांना २००९ च्या कर्जमाफीतून वगळलं होतं. २०१७ ला आपण कर्जमाफी केली त्यावेळी ज्यांना फायदा त्यापूर्वी मिळाला होता त्यांना आपण वगळलं होतं. २०१९ ला कर्जमाफी झाली. २०१९ च्या कर्जमाफीमध्ये २०१७ मध्ये ज्यांना कर्जमाफी झाली होती त्यांना वगळलं होतं. कारण कर्जमाफीसाठी जी समितीने सांगितलं की याचा आर्थिक बोजा मोठा नाही. पण कर्ज भरण्याची सवय सुटली किंवा शेतकऱ्यांना वाटतं की आपण पैसे भरले आणि कर्जमाफी झाली तर काय मिळणार त्यामुळे शेतकऱी पैसे भरत नाहीत आणि दोन्हीकडून अडचणींत येतात, म्हणून असा निर्णय घेतला जातो. तरीही ज्यावेळी मी पाहिलं की अशा प्रकारचे शेतकरी किती? तर १२ लाख शेतकरी आहेत. म्हणजेच १२ लाख शेतकरी असे होते ज्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. मग मी विचारलं की समजा आपण असं केलं की ५० हजारापर्यंत सरकारने द्यावेत आणि वरचे त्यांनी द्यायचे तर किती शेतकरी कव्हर होतात? १२ लाखपैकी ६ लाख शेतकरी असे होते ज्यांना १० ते १२ हजार भरले तरीही ५० हजारांचा फायदा मिळत होता. त्यामुळे अहवालाच्या पलिकडे जाऊन आपण ५० हजारापर्यंत सरकारने द्यावं. असा निर्णय आपण घेतला होता असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button