प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे सीनियर केजी विद्यार्थ्यांचा ‘ग्रीन डे’ उत्साहात साजरा

पिंपरी | प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे आज सीनियर केजीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ग्रीन डे’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पर्यावरण संवर्धन, निसर्गप्रेम आणि पावसाळ्याचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत आनंददायी पद्धतीने पोहोचविण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या निमित्ताने विद्यार्थ्यांनी हिरव्या रंगाचे आकर्षक पोशाख परिधान केले होते. शाळा हिरव्या रंगाच्या सजावटीने नटली होती. विद्यार्थ्यांनी झाडे, पाने, फुले, फळे तसेच पर्यावरण संरक्षणाशी संबंधित विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. शिक्षकांनी वृक्षारोपणाचे महत्त्व, स्वच्छ पर्यावरणाचे फायदे तसेच पावसाळा हा निसर्गाला नवसंजीवनी देणारा ऋतू असल्याचे विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत समजावून सांगितले.
हेही वाचा
नाशिक फाटा-खेड महामार्ग भूसंपादनासाठी निधी उपलब्ध करा!
विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण व्हावी, झाडांचे संवर्धन करावे आणि निसर्गाशी मैत्री करावी हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
शाळेच्या व्यवस्थापनाने आणि मुख्याध्यापकांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, पर्यावरणप्रेम आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना विकसित होते, असे सांगत सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालकांचे अभिनंदन केले.





