ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

एमआयटी एसीएससीमध्ये ‘AI-Powered Academic Excellence’ दोन दिवसीय कार्यशाळा यशस्वी

AI विषयक ज्ञानात भर, प्राध्यापकांसाठी सकारात्मक उपक्रम

आळंदी | प्रतिनिधी

एमआयटी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय (Autonomous), आळंदी येथे १७ व १८ जून २०२६ रोजी “AI-Powered Academic Excellence” या विषयावरील दोन दिवसीय प्राध्यापक विकास कार्यशाळा उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडली.

या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुजित शिंदे लाभले. उच्च शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा अध्यापन, मूल्यमापन, संशोधन आणि शैक्षणिक प्रशासनात प्रभावी वापर कसा करता येईल, याबाबत त्यांनी सखोल आणि प्रात्यक्षिकाधारित मार्गदर्शन केले.

कार्यशाळेत अध्यापन-अध्ययन प्रक्रिया, मूल्यमापन व परीक्षा प्रणाली, संशोधन व शोधनिबंध प्रकाशन, मानांकन व गुणवत्ता हमी, व्हिजन २०३० व संस्थात्मक विकास, शैक्षणिक प्रशासन तसेच दैनंदिन शैक्षणिक कामकाजात AI चा उपयोग अशा विविध विषयांचा समावेश होता. तसेच Prompt Engineering, शिक्षकांसाठी आवश्यक AI कौशल्ये, AI Connectors, AI-आधारित प्रकल्प, Token Optimization Techniques, AI प्रोफाइल वैयक्तिकरण आणि ChatGPT, Claude, Perplexity यांसारख्या AI प्लॅटफॉर्म्सचा शैक्षणिक गरजांनुसार परिणामकारक वापर यावर विशेष भर देण्यात आला.

हेही वाचा –  “भाजपाचे कार्य शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा” : शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे

कार्यशाळेचे स्वरूप पूर्णतः Hands-on आणि कृती-आधारित होते. प्रत्येक सत्रात प्रत्यक्ष सराव, गटचर्चा व प्रात्यक्षिक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे सहभागी प्राध्यापकांना AI साधनांचा प्रत्यक्ष वापर करून त्यांची उपयुक्तता समजून घेण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. बी. वाफारे, उपसंचालक, अधिष्ठाता, विभागप्रमुख तसेच सर्व विभागांतील प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहभागी प्राध्यापकांनी कार्यशाळेतील विविध सत्रांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशिक्षण व प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ. मंगेश भोपळे, एफडीपी समन्वयक वंदना पगार, डॉ. दीक्षा कदम आणि डॉ. सुनील पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. नियोजन, अंमलबजावणी, तांत्रिक समन्वय आणि सहभागी व्यवस्थापनात त्यांच्या योगदानामुळे कार्यशाळा प्रभावीपणे पार पडली.

AI विषयक ज्ञानात भर, संस्थेसाठी सकारात्मक

या प्रशिक्षणामुळे प्राध्यापकांच्या AI विषयक ज्ञानात व प्रत्यक्ष वापर कौशल्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, अध्यापनाची गुणवत्ता, संशोधनाची परिणामकारकता, शैक्षणिक दस्तऐवजीकरण, प्रशासकीय कार्यक्षमता आणि संस्थेच्या एकूण कार्यप्रदर्शनात सकारात्मक बदल घडण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button