आय आय बी एम कॉलेज चिखली येथे हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न!
शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना मिळाल्या जॉबच्या संधी; संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. धनंजय वर्णेकर यांनी दिला यशाचा मूलमंत्र

पिंपरी | चिखली येथील आय आय बी एम कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटमध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील डिग्री (TY) आणि डिप्लोमाच्या पासआऊट विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत उत्साहात आणि आनंदमय वातावरणात संपन्न झाला. शिक्षण पूर्ण करून व्यावसायिक क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या विद्यार्थ्यांना यावेळी पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या, तसेच विविध नामांकित हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक व अभिनंदन करण्यात आले.
या सोहळ्यात कॉलेजच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह (ट्रॉफी) देऊन गौरविण्यात आले. संस्थेने प्रवेशावेळी दिलेल्या आश्वासनानुसार, शिक्षण पूर्ण होण्याआधीच बहुतांश विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये चांगल्या नोकऱ्या मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांनी संस्थेविषयी अत्यंत अभिमान व कृतज्ञता व्यक्त केली. जे विद्यार्थी आगामी काळात उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी परदेशात जाणार आहेत, तसेच जे स्वतःचा व्यवसाय (बिझनेस) सुरू करणार आहेत, त्यांना यावेळी भविष्यातील विविध संधीं संदर्भात मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.

मनोगत व्यक्त करताना अनेक विद्यार्थी भावूक झाले होते. कॉलेजमधील जीवन, हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील त्यांचा प्रवेश आणि प्रत्येक कार्यक्रमाच्या आठवणींचा उल्लेख त्यांनी ‘अविस्मरणीय क्षण’ असा केला. “कॉलेजच्या या सुंदर आठवणी आमच्यासोबत आयुष्यभर कायम राहतील,” अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.
हेही वाचा
सोसायट्यांच्या प्रश्नांवर सर्वसाधारण सभेत मौन; सोसायटीधारकांमध्ये संताप
विद्यार्थ्यांनी आपल्याला या प्रवासात सातत्याने प्रोत्साहित केल्याबद्दल विभागप्रमुख श्री. अमोल भागवत सर, विभागप्रमुख कु. प्रतिक्षा डफळ मॅडम व एडमिन स्टाफचे विशेष कौतुक केले. तसेच हॉस्पिटॅलिटीसारखा आधुनिक अभ्यासक्रम अत्यंत सोप्या आणि दर्जेदार पद्धतीने शिकवल्याबद्दल विभागप्रमुख अनिकेत वंजारी सर, संदीप जाधव सर, एकता सिंग, गरिमा मलिक, मिलिंद तायडे आणि सर्व शिक्षकवर्गाचे मनापासून आभार मानले. कॉलेजच्या प्राचार्य मा. श्री. प्रदीप फुलकर सर यांनी लावलेली शिस्त आणि केलेले मार्गदर्शन भविष्यात नक्कीच उपयोगी पडेल, अशी कृतज्ञताही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
शिक्षकवर्गानेही आपल्या भावना व्यक्त करताना, “तुम्ही सर्व विद्यार्थी आमच्या स्मरणात कायम राहाल,” अशा शब्दांत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या.

उत्कृष्ट नियोजन आणि सांगता
हा निरोप समारंभ अत्यंत शिस्तबद्ध आणि सुंदर पद्धतीने पार पडला. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रा. संदीप जाधव यांनी केले, तर संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शिक्षकवर्ग आणि एडमिन स्टाफने यशस्वीरित्या सांभाळले. विद्यार्थी, शिक्षक आणि व्यवस्थापनाच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा सोहळा सर्वांच्याच आठवणीत राहणारा ठरला.
आयुष्यात तुम्ही कितीही मोठे व्हा, परदेशात उत्तुंग झेप घ्या, पण आपल्याला घडवणाऱ्या आपल्या आई-वडिलांना कधीही विसरू नका. वेळोवेळी आपल्या कॉलेजला भेट देऊन नवीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा, सामाजिक कार्यात सहभाग घ्या आणि देशाचे नाव उज्ज्वल करा.
– डॉ. धनंजय वर्णेकर, संस्थापक.





