Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडी

सावधान! लहानपणीचे जंक फूड मेंदूचे करू शकते ‘लाइफटाईम’ नुकसान; नवीन रिसर्च काय सांगतो?

Junk Food Brain Damage Study : लहानपणी जास्त जंक फूड ( खाण्‍यास रुचकर पण पोषकद्रव्य नसलेले अन्न) खाल्ल्याने मेंदूमध्ये असे काही कायमस्वरूपी बदल होतात, तरुण वयात चांगला आणि सकस आहार घेतला तरीही त्‍यामध्‍ये बदलत नाहीत. जास्त चरबी आणि जास्त साखर असलेल्या अन्नामुळे मुलांच्या खाण्याच्या सवयी तर बिघडतातच; पण सोबतच भूक नियंत्रित करणाऱ्या मेंदूच्या भागावरही याचा खूप वाईट परिणाम होतो, असे नवीन संशोधनात स्‍पष्‍ट झाले आहे.

आजकालची मुले अशा प्रक्रिया केलेल्या (Highly processed) अन्नपदार्थांनी वेढलेली आहेत ज्यांची मोठ्या प्रमाणावर जाहिरात केली जाते आणि जे सहज उपलब्ध होतात. वाढदिवसाच्या पार्ट्या, शाळेतील कार्यक्रम, क्रीडा उपक्रम आणि चांगल्या वर्तनाचे बक्षीस म्हणूनही साखरयुक्त आणि चरबीयुक्त पदार्थ देणे सामान्य झाले आहे. लहानपणी जंक फूड खाल्ल्याने मेंदूवर नेमका कोणता परिणाम होतो, याबाबत ‘युनिव्हर्सिटी कॉलेज कॉर्क’ (UCC)मध्‍ये संशोधन झाले. जी मुले नियमितपणे जास्त चरबीयुक्त आणि साखरयुक्त पदार्थ खातात, त्यांच्या मेंदूमध्ये कायमस्वरूपी बदल होऊ शकतात, जे त्यांचा आहार सुधारल्यानंतरही दीर्घकाळ टिकून राहल्‍याचे या संशोधनात दिसून आले.

‘UCC’ मधील आघाडीचे संशोधन केंद्र असलेल्या ‘APC मायक्रोबायोम’ (APC Microbiome) च्या शास्त्रज्ञांच्‍या संशोधनात आढळले की, लहान वयातील अस्वास्थ्यकर आहारामुळे (Unhealthy diet) मेंदू भूक आणि खाण्यावर नियंत्रण कसे ठेवतो यामध्ये बदल होऊ शकतात. अस्वास्थ्यकर आहार बंद केल्यानंतर आणि शरीराचे वजन सामान्य झाल्यावरही हे बदल तसेच कायम राहिले. संशोधकांचे म्हणणे आहे की, या पदार्थांच्या सतत संपर्कात आल्यामुळे लहान वयातच खाण्याच्या आवडीनिवडी तयार होऊ शकतात आणि अशा खाण्याच्या सवयी जडू शकतात ज्या प्रौढावस्थेपर्यंत कायम राहतात.

हेही वाचा –  बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करून ललित प्रभाकरच्या सिनेमाची OTT वर एन्ट्री

‘नेचर कम्युनिकेशन्स’ (Nature Communications) मध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात असे आढळून आले आहे की, लहान वयात कॅलरी-युक्त परंतु पोषक तत्वांची कमतरता असलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने खाण्याच्या वर्तनावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. संशोधकांनी यासाठी उंदरांवर एक प्रयोग केला. ज्या प्राण्यांना लहान वयात जास्त चरबी आणि जास्त साखरयुक्त आहार दिला गेला, त्यांच्या खाण्याच्या सवयींमध्ये प्रौढ झाल्यावरही कायमचे बदल दिसून आले.संशोधक पथकाने या वर्तनाचा संबंध ‘हायपोथॅलेमस’ (Hypothalamus) मधील बिघाडाशी जोडला आहे. हायपोथॅलेमस हा मेंदूचा असा भाग आहे जो भूक आणि ऊर्जेचा समतोल नियंत्रित करण्यासाठी जबाबदार असतो.

आतड्यांतील मायक्रोबायोमचा (Gut microbiome) वापर करून हे दुष्परिणाम रोखता येऊ शकतात का, याचाही या संशोधनात अभ्यास करण्यात आला. शास्त्रज्ञांनी एका फायदेशीर बॅक्टेरियाच्या जातीची (Bifidobacterium longum APC1472) चाचणी केली. यासोबतच प्रिबायोटिक फायबर्सचाही प्रयोग केला. हे फायबर्स कांदा, लसूण, लीक, अळू (Asparagus) आणि केळी यांसारख्या पदार्थांमध्ये नैसर्गिकरित्या असतात आणि सप्लिमेंट्समध्येही सहज उपलब्ध होतात. निष्कर्षानुसार, जर हे उपाय आयुष्यभर केले गेले, तर दोन्ही पद्धतींचे संभाव्य फायदे दिसून आले आहेत. आतड्यांतील बॅक्टेरिया खाण्याच्या चांगल्या सवयी पुनर्संचयित करण्यास करू शकतात मदत.

या अभ्यासाच्या प्रमुख लेखिका डॉ. क्रिस्टिना कुएस्ता-मार्टी यांनी म्‍हटलं आहे की, “आमचे निष्कर्ष दर्शवतात की आपण लहान वयात काय खातो याला खरोखरच खूप महत्त्व आहे. लहान वयातील आहारामुळे खाण्याच्या सवयींवर असे छुपे, दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात जे केवळ वजनावरून लगेच दिसून येत नाहीत.”लहान वयातील अस्वास्थ्यकर आहारामुळे खाण्याच्या वर्तनाशी संबंधित मेंदूचे मार्ग विस्कळीत होतात आणि हे परिणाम प्रौढावस्थेपर्यंत चालू राहतात, असे संशोधकांना आढळले. यामुळे भविष्यात लठ्ठपणाचा (Obesity) धोका वाढू शकतो, असा इशारा या निष्कर्षातून मिळतो.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button