ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नागरिकांच्या सहभागातून जनगणनेला मिळणार गती

पिंपरी चिंचवड शहराच्या विकासासाठी माहिती ठरणार महत्त्वाची

पिंपरी | जनगणना २०२७ अंतर्गत घरयादी व घरगणनेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात पिंपरी चिंचवड शहरात १६ मे २०२६ पासून सुरू झाली असून, ही प्रक्रिया १४ जून २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. या मोहिमेदरम्यान नियुक्त प्रगणक नागरिकांच्या घरी भेट देऊन आवश्यक माहिती संकलित करत आहेत. तरी नागरिकांनी प्रगणकांना योग्य व संपूर्ण माहिती देऊन सहकार्य करावे, तसेच स्व-नोंदणी केलेल्या नागरिकांनी आपला स्वयं नोंदणी क्रमांक उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

घरयादी व घरगणना ही जनगणनेतील अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून, यामध्ये घरांची स्थिती, कुटुंबातील सदस्यांची माहिती आणि उपलब्ध नागरी सुविधांची नोंद केली जाते. या माहितीच्या आधारे शासन विविध विकासकामांचे नियोजन, सुविधा वितरण तसेच सामाजिक कल्याण योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करते त्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि अचूक माहितीमुळे भविष्यातील शहर विकासाला दिशा मिळणार असल्याचे उप आयुक्त तथा शहर जनगणना अधिकारी सचिन पवार यांनी सांगितले.

हेही वाचा

KKR चा मुंबईवर दमदार विजय, प्लेऑफच्या आशा कायम; ‘असं’ आहे कोलकातासाठी समीकरणांचं गणित!

जनगणना ही केवळ लोकसंख्येची नोंद नसून, शहराच्या भविष्यातील गरजा ओळखण्याचे प्रभावी माध्यम आहे. नागरिकांनी दिलेली अचूक माहिती ही विकास योजनांच्या योग्य अंमलबजावणीसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. त्यामुळे प्रत्येकाने सकारात्मक सहभाग घेऊन जनगणना प्रक्रिया यशस्वी करावी.

– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.

घरयादी व घरगणना मोहिमेदरम्यान नागरिकांनी प्रगणकांना आवश्यक माहिती वेळेत उपलब्ध करून द्यावी. जनगणनेसाठी दिलेली माहिती पूर्णपणे सुरक्षित ठेवली जाते. नागरिकांच्या सहकार्यामुळेच अचूक माहिती संकलित होऊन शहराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार आहे.

– सचिन पवार, उप आयुक्त तथा शहर जनगणना अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका. 

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button