ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्वच्छतेत अव्वल पिंपरी चिंचवडसाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा; डॉ. विजय सूर्यवंशी

स्वच्छ आणि सुंदर पिंपरी चिंचवडसाठी सामूहिक सहभागाची गरज

पिंपरी | पिंपरी चिंचवड शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि देशातील आदर्श शहर म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी नागरिकांच्या सक्रिय सहभागाची आवश्यकता असल्याचे मत डॉ. विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.

स्वच्छ सर्वेक्षण २०२५–२६ अंतर्गत नागरिकांकडून मिळणारा अभिप्राय हा शहराच्या स्वच्छता व्यवस्थेचे मूल्यमापन करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने स्वतःहून पुढाकार घेत आपला अभिप्राय नोंदवून शहराला देशात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

स्वच्छ आणि सुंदर शहर घडविणे, ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. स्वच्छ सर्वेक्षणात नागरिकांनी दिलेला अभिप्राय शहराच्या कामगिरीचे प्रतिबिंब ठरतो. त्यामुळे प्रत्येकाने सकारात्मक सहभाग नोंदवून पिंपरी चिंचवडला देशातील स्वच्छ शहरांच्या अग्रक्रमावर नेण्यासाठी योगदान द्यावे, असे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी सांगितले.

हेही वाचा

‘अणुऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र नेतृत्वासाठी सज्ज; अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल म्हणाले की, नागरिकांचा सहभाग आणि सहकार्य हे स्वच्छता अभियानाच्या यशाचे मुख्य बळ आहे. नागरिकांनी अभिप्राय नोंदविताना शहरातील स्वच्छतेबाबतच्या उपक्रमांना प्रोत्साहन द्यावे. प्रत्येक अभिप्राय प्रशासनाला अधिक प्रभावी नियोजन करण्यास मदत करणार असून, स्वच्छ आणि सुंदर शहर घडविण्याच्या प्रयत्नांना गती मिळेल त्याचबरोबर, शहराच्या स्वच्छता अभियानात प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वय महत्त्वाचा असून, प्रत्येकाने जबाबदारीची जाणीव ठेवून सहभाग नोंदवणे आवश्यक आहे.

अभिप्राय नोंदविण्यासाठी नागरिकांनी https://cf.sbmurban.org या संकेतस्थळाला भेट देऊन विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button