Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

पंजाबची बादशाही संपली! हैदराबाद अव्वल स्थानी, गुणतालिकेत मोठी उलथापालथ

IPL 2026 Points Table | आयपीएल २०२६ चा हंगाम आता अत्यंत चुरशीच्या वळणावर आला असून प्रत्येक सामन्यागणिक गुणतालिकेतील समीकरणे बदलताना दिसत आहेत. गुरुवारी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या अटीतटीच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्सचा ३३ धावांनी पराभव केला. या विजयासह हैदराबादने गुणतालिकेत थेट अव्वल स्थान काबीज केले असून, दीर्घकाळ पहिल्या स्थानावर असलेल्या पंजाबला दुसऱ्या स्थानी घसरावे लागले आहे.

हैदराबादची ‘दमदार’ कामगिरी

स्पर्धेच्या सुरुवातीला चाचपडणाऱ्या सनरायझर्स हैदराबादने मोक्याच्या क्षणी आपला फॉर्म परत मिळवला आहे. गेल्या ५ पैकी ४ सामन्यात विजय मिळवत हैदराबादने आता ११ सामन्यांत ७ विजयांसह १४ गुणांची कमाई केली आहे. दुसरीकडे, सलग ३ पराभवांमुळे पंजाब किंग्सची घसरण झाली असून १० सामन्यांत १३ गुणांसह ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

हेही वाचा

पश्चिम बंगालमध्ये राजकीय खळबळ! सुवेंदू अधिकारी यांच्या स्वीय सहाय्यकाची गोळ्या झाडून हत्या

क्लासेन आणि इशान किशनची फटकेबाजी

हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना ४ गड्यांच्या मोबदल्यात २३५ धावांचा डोंगर उभा केला. हेनरिक क्लासेनने आक्रमक ६९ धावांची खेळी केली, तर इशान किशनने ५५ आणि ट्रॅव्हिस हेडने ३८ धावांचे योगदान दिले. पंजाबच्या गोलंदाजांना हैदराबादच्या फलंदाजीसमोर फारसा प्रभाव पाडता आला नाही.

कॉनोलीचे शतक व्यर्थ

२३६ धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात खराब झाली. सलामीवीर कुपर कॉनोलीने एक बाजू लावून धरत नाबाद १०७ धावांचे शानदार शतक ठोकले. मात्र, त्याला इतर कोणत्याही फलंदाजाची साथ लाभली नाही. परिणामी, पंजाबचा संघ विजयापासून ३३ धावा दूर राहिला.

अव्वल ४ साठी चुरस वाढली

पंजाबच्या या पराभवामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB), राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या संघांच्या आशा उंचावल्या आहेत. या तिन्ही संघांचे सध्या प्रत्येकी १२ गुण असून त्यांच्याकडेही ‘टॉप २’ मध्ये स्थान मिळवण्याची मोठी संधी आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्स १० गुणांसह सहाव्या क्रमांकावर असून त्यांना प्ले-ऑफच्या शर्यतीत टिकण्यासाठी आगामी सामने जिंकणे अनिवार्य आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button