Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

डाव्यांचा शेवटचा गड कोसळला! केरळमध्ये काँग्रेसप्रणीत आघाडीला स्पष्ट बहुमत

Kerala Election Results | पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू राज्यांप्रमाणेच केरळमध्येही मतदारांनी सत्ताबदलाचा स्पष्ट कौल दिला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या कलानुसार, काँग्रेसप्रणीत युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटने (UDF) ८४ जागांवर आघाडी घेत बहुमताचा आकडा पार केला आहे. दुसरीकडे, सत्ताधारी डाव्या आघाडीला (LDF) केवळ ४१ जागांवर समाधान मानावे लागत असून, भाजपने १ जागेवर आघाडी घेतली आहे.

काही दिवसांपूर्वी आलेल्या एक्झिट पोल्समध्ये काँग्रेसप्रणीत यूडीएफ आघाडीचे सरकार स्थापन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. विद्यमान मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील एलडीएफचा पराभव होईल, हा अंदाज आता निकालाच्या कलानुसार सत्यात उतरताना दिसत आहे.

हेही वाचा

मोहम्मद सिराजने रचला इतिहास! आयपीएलमध्ये ‘असा’ पराक्रम करणारा पहिलाच गोलंदाज

डाव्यांचा ऐतिहासिक अस्त डाव्या पक्षांसाठी हा निकाल अत्यंत धक्कादायक मानला जात आहे. पश्चिम बंगालमध्ये १९७७ ते २०११ अशी सलग ३४ वर्षे आणि त्रिपुरामध्ये १९९३ ते २०१८ या काळात डाव्यांनी एकहाती सत्ता गाजवली होती. केरळमध्येही दर पाच वर्षांनी सत्ताबदल होण्याची परंपरा होती, मात्र २०२१ मध्ये पिनराई विजयन यांनी सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवत इतिहास घडवला होता. आता २०२६ च्या निवडणुकीत ही सत्ता गमावल्यामुळे डाव्यांचा देशातील शेवटचा बालेकिल्लाही ढासळला आहे.

राजकीय परिणाम १९७७ नंतर भारताच्या इतिहासात प्रथमच एकाही राज्यात डाव्यांचे सरकार उरणार नाही. तसेच, सुमारे पाच दशकांनंतर देशात एकही कम्युनिस्ट मुख्यमंत्री नसेल. केरळमधील या पराभवामुळे डाव्या पक्षांचा राष्ट्रीय राजकारणातील प्रभाव आणि अस्तित्व मोठ्या प्रमाणावर कमी होईल, अशी शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे. २०१६ पासून सत्तेत असलेल्या एलडीएफला मतदारांनी नाकारल्याने आता केरळमध्ये काँग्रेसप्रणीत आघाडीच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button