Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नाशिकमध्ये भीषण दुर्घटना; मोटार विहिरीत कोसळून नऊ जणांचा मृत्यू

नाशिक | खासगी क्लासचे स्नेहसंमेलन आटोपून घरी परतत असलेल्या कुटुंबीयांची मोटार शेतातील विहिरीत कोसळल्याने नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी रात्री दिंडोरी येथे घडली. मृतांमध्ये सहा विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचा समावेश आहे.

दिंडोरी येथील शिवाजीनगर भागातील राजे बॅक्वेट हॉल व मंगल कार्यालयात खासगी क्लासतर्फे स्नेहसंमेलन व गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी शहरासह आसपासच्या गावांतील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम रात्री सुमारे दहा वाजता संपल्यानंतर इंदोरे येथील दरगोडे कुटुंबीय एर्टिगा मोटारीने घरी निघाले. याच दरम्यान मंगल कार्यालय परिसरातील शेतातील पाण्याने भरलेल्या विहिरीत त्यांची मोटार अचानक कोसळली.

हेही वाचा      :              दिल्लीसह उत्तर भारत भूकंपाने हादरला; रिष्टर स्केलवर ५.९ तीव्रता

घटनेची माहिती मिळताच दिंडोरी नगरपंचायतीचे अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. विहीर पाण्याने पूर्ण भरलेली असल्याने बचाव कार्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. अखेर तीन क्रेनच्या साहाय्याने मध्यरात्री सुमारे बारा वाजता मोटार विहिरीतून बाहेर काढण्यात आली.

या भीषण दुर्घटनेत सुनील दत्तात्रेय दरगोडे (३५), रेश्मा सुनील दरगोडे (३३), राखी सुनील दरगोडे, आशा अनिल दरगोडे, सृष्टी अनिल दरगोडे (१६), श्रेयस अनिल दरगोडे (११), माधुरी अनिल दरगोडे, श्रावणी अनिल दरगोडे आणि समृद्धी राजेश दरगोडे (७) यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

रात्रीच्या अंधारात कठडा नसलेल्या विहिरीचा अंदाज चालकाला आला नसावा, असा प्राथमिक अंदाज प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केला आहे. संबंधित विहीर राजू राजे यांच्या मालकीची असल्याचे सांगितले जात असून, या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button