Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

‘नो-स्ट्रॅटेजी वॉर’ म्हणत गालीबाफ यांचा अमेरिकेवर जोरदार निशाणा

Ghalibaf Mocks Trump | इराणी संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बघेर गालीबाफ यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका करत अमेरिका आणि इस्रायलने तेहरानवर केलेल्या संयुक्त हल्ल्याला “विना-रणनीतीचे युद्ध” (no-strategy war) असे संबोधले आहे. इराणने एकाच दिवशी अमेरिकेची दोन लष्करी विमाने पाडल्याचा आणि दोन ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरवर हल्ला केल्याचा दावा केल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

गालीबाफ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत अमेरिकेवर उपरोधिक शब्दांत टीका केली. “इराणला सलग ३७ वेळा पराभूत केल्यानंतर, त्यांनी सुरू केलेल्या या उत्कृष्ट विना-रणनीती युद्धाची पातळी आता ‘सत्तापालट’ वरून ‘कोणी आमच्या वैमानिकांना शोधू शकेल का? प्लीज?’ इथपर्यंत खाली घसरली आहे,” असे त्यांनी म्हटले. यासोबत त्यांनी विनवणी करणारा इमोजी वापरत “वा, काय ही प्रगती! अगदी अलौकिक बुद्धिमत्ता!” असा टोला लगावला.

हेही वाचा       :                अमेरिका-इस्रायल आणि इराण संघर्षात रशियाची एन्ट्री; शांततेसाठी प्रस्ताव

इराणचा दावा काय?

इराणने शुक्रवारी दावा केला की त्यांनी अमेरिकेचे एक F-15 लढाऊ विमान आणि एक A-10 हल्लेखोर विमान पाडले आहे. अमेरिकन माध्यमांच्या वृत्तानुसार, F-15 विमानातील दोन क्रू मेंबर्सपैकी एकाला सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे. तर A-10 विमान कुवेतच्या हवाई हद्दीत कोसळले असले तरी त्याचा वैमानिक सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय, शोध मोहिमेत सहभागी असलेल्या दोन ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरनाही इराणने लक्ष्य केल्याचे वृत्त असून या घटनेमुळे मध्यपूर्वेत तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button