Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

डॉ. सुहास कांबळे, तरस, जगताप, प्रियंका कुदळे ‘जायंट किलर’

६४ नवख्या चेहऱ्यांनी बाजी मारली

पिंपरी चिंचवड :काही प्रभागांमध्ये अत्यंत अनपेक्षित निकाल लागल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. प्रस्थापित व वजनदार उमेदवारांचा पराभव झाला, तर तुलनेने नवख्या चेहऱ्यांनी बाजी मारली. दरम्यान यंदाच्या महापालिकेच्या सभागृहात 64 नवे चेहरे प्रवेश करणार आहेत.

प्रभाग ८ मध्ये भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेल्या सीमा सावळे यांना भाजपच्या डॉ. सुहास कांबळे यांनी धक्का दिला. याच प्रभागातून भाजपचेच स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांना राष्ट्रवादीच्या तुषार शहाणे यांनी कात्रजचा घाट दाखवला.

प्रभाग १६ मधून राष्ट्रवादीचे मातब्बर नेते मोरेश्वर भोंडवे यांना शिंदेसेनेचे शहरप्रमुख नीलेश तरस यांनी धूळ चारली. प्रभाग २० मध्येही लक्षणीय उलथापालथ झाली. राष्ट्रवादी (शरद पवार) च्या सुलक्षणा धर यांचा पराभव करून राष्ट्रवादी (अजित पवार) चे जितेंद्र ननावरे यांनी मागील उद्दे काढले. याच प्रभागात राष्ट्रवादीच्या नवख्याv वर्षा जगताप यांनी भाजपच्या महिला शहराध्यक्षा सुजाता पालांडे यांच्यावर विजय मिळवला.

हेही वाचा –  अजित पवारांच्या आरोपांना नागरिकांनी नाकारले

शेवटच्या फेरीपर्यंत चुरस

सर्वांत जाएंट किलर ठरल्या प्रभाग २१ मधील राष्ट्रवादीच्या प्रियंका कुदळे. भाजपच्या माजी स्थायी समिती अध्यक्षा उषा वाघेरे यांना त्यांनी धूळ चारली. प्रभाग ३२मध्ये दोघा स्थायी समितीच्या माजी अध्यक्षांची लढत झाली. त्यात राष्ट्रवादीच्या अतुल शितोळे यांच्यावर भाजपच्या प्रशांत शितोळेंनी बाजी मारली. या प्रभागातील धक्कादायक निकालाबाबत दिवसभर चर्चा सुरू होती.

६४ नवे चेहरे सभागृहात

१२८ जागांपैकी ६४ नवे चेहरे निवडून आले आहेत. तर, ६४ जुने नगरसेवक पुन्हा सभागृहात आले आहेत. भाजपचे ४३, राष्ट्रवादीचे १७, शिंदे गटाचे ४ यांना जनतेने संधी दिली आहे. भाजपचे सोनम मोरे, सुजाता बोराटे, निखिल बोऱ्हाडे, सारिका गायकवाड, अर्चना सस्ते, सचिन तापकीर, श्रुती डोळस, उदय गायकवाड, कृष्णा सुरकुले, कविता भोंगाळे, रेखा देवकर, राजश्री लांडगे, योगेश लांडगे, राणी पठारे, सुहास कांबळे, सुप्रिया चांदगुडे, कुशाग्र कदम, रिटा सानप, नीलेश नेवाळे, शीतल वर्णेकर, शिवानी नरळे, अनिल घोलप, अर्चना करांडे, कैलास कुटे, धर्मपाल तंतरपाळे, पल्लवी वाल्हेकर, मनीषा चिंचवडे, मधुरा शिंदे, मंदार देशपांडे, कोमल काळे, तानाजी बारणे, कुणाल वाव्हळकर, रेश्मा भुजबळ, श्रुती वाकडकर, स्नेहा कलाटे, अर्चना तापकीर, अनिता काटे, कुंदा भिसे, रविना आगोळकर, श्याम जगताप, ज्ञानेश्वर जगताप, पल्लवी जगताप, तृप्ती कांबळे हे पहिल्यांदाच निवडून आले आहेत. राष्ट्रवादीचे विकास साने, यश साने, विराज लांडे, अश्विनी वाबळे, तुषार सहाने, सिद्धार्थ बनसोडे, सारिका मासूळकर, अरुणा लंगोटे, शेखर चिंचवडे, मनीषा लांडे, वर्षा जगताप, प्रियांका कुदळे, सागर कोकणे, योगिता बारणे, प्रतीक्षा लांघी, दीप्ती कांबळे, उज्ज्वला ढोरे आणि शिंदे गटाचे ऐश्वर्या तरस, रेश्मा कातळे, नीलेश तरस, विश्वजीत बारणे यांना पहिल्यांदाच संधी मिळाली आहे

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button