Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पालिकेकडून कंत्राटी महिला कामगारांना रात्रीच्या वेळी सफाई कामातून दिलासा

पिंपरी चिंचवड : रात्रीच्या वेळी रस्ते सफाई व कचरा संकलनाचे काम लावल्यामुळे कंत्राटी महिला सफाई कामगारांना होणाऱ्या त्रासाबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर अखेर महापालिका प्रशासनाने निर्णयात बदल केला आहे.

नव्या निर्णयानुसार आता शहरातील निम्म्या भागात दिवसा आणि निम्म्या भागात रात्री साफसफाईचे काम केले जाणार आहे. यामुळे कंत्राटी महिला कामगारांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत कंत्राटी पद्धतीने रस्ते सफाई व कचरा संकलनाचे काम केले जाते. या कामात मोठ्या प्रमाणावर महिला कामगार कार्यरत आहेत. यापूर्वी दिवसा सुरू केले जाणारे साफसफाईचे काम अचानक रात्री करण्याचे आदेश दिले होते. यामुळे महिला कामगारांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती.

हेही वाचा –  डॉ. सुहास कांबळे, तरस, जगताप, प्रियंका कुदळे ‘जायंट किलर’

लेखी संमती दिल्यास रात्रपाळीचे काम

महापालिकेने सरसकट रात्रपाळी रद्द करून शहरातील सर्व प्रभागांत ५० टक्के काम दिवसा आणि ५० टक्के काम रात्री करण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच रात्रपाळीत महिला कामगारांकडून काम करून घेण्यापूर्वी त्यांची लेखी संमती घेण्यात येईल., संमती असलेल्या महिलांनाच रात्रपाळीचे काम देण्यात येईल, अशी माहिती उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी दिली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button