Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

मिसिंग लिंकच्या खर्चात १० टक्क्यांनी वाढ ६८५० कोटी रुपयांचा खर्च ७५०० कोटींच्या घरात; आव्हानात्मक कामामुळे प्रकल्पास विलंब…

मुंबई : मुंबई-पुणे प्रवास आणखी जलद आणि सुरक्षित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मिसिंग लिंक प्रकल्प हाती घेतला आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खोपोली ते कुसगाव अशी १९.८० किमीची नवीन मार्गिका अर्थात मिसिंग लिंक बांधण्याच्या कामाला २०१९ मध्ये सुरुवात करण्यात आली आहे. ही मार्गिका आतापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र या प्रकल्पाच्या कामास मोठी विलंब झाला असून परिणामी आता प्रकल्प खर्चात मोठी वाढ झाली आहे. मिसिंग लिंकच्या खर्चात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे ६८५० कोटींचा खर्च ७५०० कोटींच्या घरात जाणार आहे. मिसिंग लिंकचे काम प्रचंड आव्हानात्मक असल्याने कामास विलंब होत असल्याचे एमएसआरडीसीचे म्हणणे आहे.

एमएसआरडीसीच्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गामुळे मुंबई ते पुणे अंतर अडीच तासात पार करता येत आहे. मात्र आता हा द्रुतगती मार्ग वाढत्या वाहनसंख्येला सामावून घेण्यास अपुरा पडू लागला आहे. त्यामुळे महामार्गावर गर्दीच्या वेळेस मोठी वाहतूक कोंडी असते. अशात येत्या काळात वाहनसंख्या आणखी वाढणार असल्याने एमएसआरडीसीने मिसिंग लिंक प्रकल्प हाती घेतला आहे. खोपोली ते कुसगाव अशी १९.८० किमीच्या मिसिंग लिंकच्या कामाला दोन टप्प्यात २०१९ मध्ये सुरुवात करण्यात आली. हा प्रकल्प २०२२ मध्ये पूर्ण करत मिसिंग लिंक वाहतूक सेवेत दाखल करणे अपेक्षित होते. मात्र या प्रकल्पास तीन-चार वर्षांचा विलंब झाला आहे.

हेही वाचा –  विराट अन् श्रेयस अय्यरच्या वादळात न्यूझीलंड भुईसपाट; 4 गडी राखून धुव्वा उडवला, मालिकेत 1-0 ने आघाडी

दरम्यान या प्रकल्पाच्या पुर्णत्वासाठी एमएसआरडीसीकडून डिसेंबर २०२२, त्यानंतर जून २०२३, त्यानंतर जानेवारी २०२४, मार्च २०२४, डिसेंबर २०२५ अशा अनेक तारखा देण्यात आल्या. मात्र काम काही पूर्ण झाले नसून अजूनही मिसिंग लिंक सेवेते दाखल होण्याची प्रतीक्षा आहे. या मार्गिकेची प्रतीक्षा असतानाच दुसरीकडे प्रकल्पास मोठा विलंब झाल्याने त्याचा परिणाम प्रकल्प खर्चात वाढ होण्यात झाला आहे. या प्रकल्पाचा मूळ खर्च ६८५० कोटी रुपये असा आहे.हा खर्चात मोठी वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे. तर नुकत्याच झालेल्या लोकसत्ता लोकसंवादमध्ये आदित्य ठाकरे यांनीही या प्रकल्पास विलंब होत असून परिणामी खर्चवाढ झाल्याचा आरोप केला होता.

याविषयी एमएसआरडीसीकडे विचारणा केली असता प्रकल्प खर्च वाढ झाल्याच्या वृत्तास अधिकार्यांनी दुजोरा दिला आहे. अद्याप प्रकल्प पूर्ण व्हायचा असून मार्चपर्यंत प्रकल्प पूर्ण होईल. त्यानंतर नेमकी किती खर्च या प्रकल्पासाठी झाला हे स्पष्ट होईल. मात्र आतापर्यंत अंदाजे १० टक्के खर्च वाढ झाल्याचा अंदाज असल्याचेही अधिकार्यांनी सांगितले. त्यामुळे ६८५० कोटींचा खर्च आता ७५०० कोटींवर गेला असल्याचे म्हटले जात आहे. डोंगराखालून, तलावाखालून बोगदे नेणे, उंचावर केबल स्टेड पूल बांधणे अशी आव्हानात्मक कामे या प्रकल्पात आहेतच. पण त्याचवेळी उंचावर,दर्या खोर्यात काम करताना उन्ह,वारा, पाऊस सगळ्यांचा समाना करावा लागतो. त्यामुळे हे काम अत्यंत आव्हानात्मक असल्यानेच प्रकल्पास विलंब झाल्याचेही अधिकार्यांनी सांगितले. तर आता काम अंतिम टप्प्यात आहे, ९० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. मार्चपर्यंत १०० टक्के काम पूर्ण करत त्यानंतर ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल केली जाईल असेही अधिकार्यांनी सांगितले. मात्र या प्रकल्प विलंबामुळे खर्चात मोठी वाढ झाली आहे, हे मात्र खरे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button