रोहित-विराटची धडाकेबाज भागीदारी; भारताचा ऑस्ट्रेलियावर ९ विकेट्सने दणदणीत विजय

IND vs AUS | सिडनीत झालेल्या एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर एकतर्फी ९ विकेट्सने विजय मिळवत मालिकेचा शानदार शेवट केला. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या जबरदस्त १६८ धावांच्या भागीदारीमुळे भारताने २३७ धावांचं लक्ष्य सहज पार केलं.
भारताकडून कर्णधार रोहित शर्माने १२५ चेंडूत नाबाद १२१ धावा झळकावत दमदार शतक ठोकलं. त्याच्या खेळीत १३ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. तर विराट कोहलीने ८१ चेंडूत ७ चौकारांसह नाबाद ७४ धावा करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

हेही वाचा : श्री उमांगमलज जन्मोत्सवात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला ११०० श्रीफळांचा महानैवेद्य
शुबमन गिलने २६ चेंडूत २४ धावा करून सुरुवातीला चांगली साथ दिली. त्यानंतर रोहित-विराट जोडीने जबाबदारीने खेळ करत संघाला विजयाच्या दिशेने नेलं. भारताने फक्त ३८.३ षटकांत २३७ धावा करत लक्ष्य गाठलं.
भारताच्या विजयात गोलंदाज हर्षित राणानेही महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने जबरदस्त गोलंदाजी करत ४ विकेट्स घेतल्या आणि ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना दबावाखाली ठेवलं. या विजयासह भारताने मालिकेत २-१ असा विजय मिळवला असून, रोहित-विराटच्या या ऐतिहासिक भागीदारीने पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटप्रेमींचं मन जिंकलं आहे.





