वेस्ट इंडिजविरूद्ध कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, रिषभ पंत, करुण नायरला डच्चू

India Test Squad Announced | भारताचा वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर करण्यात आला आहे. या मालिकेत शुबमन गिलला संघाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात आली असून, अष्टपैलू रवींद्र जडेजा उपकर्णधार म्हणून कार्य करणार आहे. पहिला सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होईल. तर दुसरा सामना दिल्लीमधील अरूण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे.
इंग्लंड मालिकेत खेळलेला करूण नायर यावेळी संघाबाहेर आहे. दुखापतीतून पूर्णपणे सावरला नसल्याने ऋषभ पंतलाही या मालिकेत संधी मिळालेली नाही. त्यामुळे यष्टीरक्षणासाठी ध्रुव जुरेल आणि एन. जगदीशन यांचा समावेश करण्यात आला आहे.
अष्टपैलू खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल यांनी संधी दिली आहे. तर गोलंदाजी विभागाचं नेतृत्त्व जसप्रीत बुमराह करेल. वेगवान गोलंदाजीत बुमराहला साथ देण्यासाठी मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, नितीश कुमार रेड्डी असतील. तर कुलदीप यादव अक्षर, वॉशिंग्टन सुंदर, जडेजासह चार फिरकीपटू संघात आहेत. तर यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल हे टॉप ऑर्डरमधील फलंदाज असतील.
हेही वाचा : मुख्यमंत्र्यांकडून सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी
भारताचा वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटीसाठी संघ
शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, के.एल. राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश रेड्डी, एन. जगदीशन, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, कुलदीप यादव
कसोटी मालिकेचं वेळापत्रक
पहिली कसोटी – २ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबर – सकाळी ९.३० – नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
दुसरी कसोटी – १० ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर – सकाळी ९.३० – अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली





