ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

क्रांती दिन सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

शिक्षण विश्व: संत साई शाळेत शिक्षक व पालकांप्रती कृतज्ञतेची अनोखी भावना

पिंपरी चिंचवड : भोसरी येथील संत साई हायस्कूलमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही क्रांती दिन सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. या वर्षी हा सप्ताह “कृतज्ञता वर्ष” म्हणून साजरा करताना, शाळेने शिक्षक व पालक या विद्यार्थ्यांच्या विकासातील दोन महत्त्वाच्या आधारस्तंभांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यावर भर दिला.

कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन व मशाल प्रज्वलनाने झाली. प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी-चिंचवड मुख्याध्यापक संघ अध्यक्ष संभाजी पडवळ, मुख्याध्यापक संघ सचिव सुबोध गलांडे, शिक्षिका आशा बोठे उपस्थित होते. पाहुण्यांची ओळख शिक्षिका मोहिनी नढे यांनी करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ५ वी चे विद्यार्थी विराट जयस्वाल व जॉर्डन सिंग यांनी तर आभार प्रदर्शन दक्षा सोमवंशी हिने केले. या निमित्ताने शाळेत पालक-शिक्षक सन्मान समारंभ, कृतज्ञता या विषयावर आधारित गाणी, कविता, नाटिका विद्यार्थ्यांनी सादर केल्यापालक व शिक्षकांच्या योगदानाबद्दल विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली

हेही वाचा      :      ‘भारताने पाकिस्तानची ६ विमाने नष्ट केली’; भारतीय हवाई दलाचे प्रमुख एपी सिंग यांचे मोठे विधान

पाहुण्यांनी आपल्या भाषणात पालकांच्या संस्कारांचे व शिक्षकांच्या शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत असे सांगितले की, “घर आणि शाळा हीच खरी कार्यशाळा असून, यामधूनच जबाबदार आणि देशभक्त नागरिक घडतो.”या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक शिवलिंग ढवळेश्वर, मुख्याध्यापिका सुनीता ढवळेश्वर, उपमुख्याध्यापिका रूपाली खोल्लम , शाळेचे ट्रस्टी पायल ढवळेश्वर, तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व पालक-शिक्षक संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.संत साई हायस्कूलच्या या उपक्रमामुळे शिक्षक व पालक यांचे योगदान नव्या पिढीसमोर प्रभावीपणे मांडले गेले. क्रांती दिनाच्या निमित्ताने साजरा झालेला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रप्रेमासोबतच कृतज्ञतेचा भाव जागवणारा ठरला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button