TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

‘राहुल गांधींचा अजेंडा सनातनविरोधी’; कंगना रणौतची घणाघाती टीका

क्रिती सेनॉनच्या जाहिरातीवरून कंगनाचा राहुल गांधींवर निशाणा; ‘हिंदू संस्कृती पुसण्याचा प्रयत्न’ केल्याचा आरोप

मुंबई : अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौतने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी यांची विचारसरणी ही सनातनविरोधी असून सनातनवर हल्ला करणे हाच त्यांचा अजेंडा असल्याचा आरोप कंगनाने केला. क्रिती सेनॉनच्या एका जाहिरातीवरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी क्रितीची बाजू घेत केलेल्या पोस्टबाबत कंगनाला प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने राहुल गांधींवर निशाणा साधला.

कंगना रणौतने डीडी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत क्रिती सेनॉनच्या जाहिरातीवर आपली भूमिका स्पष्ट केली. रक्षाबंधनाशी संबंधित जाहिरातीत हिंदू संस्कृतीतील पारंपरिक बाबी योग्य पद्धतीने दाखवण्यात आल्या नसल्याचा आक्षेप तिने घेतला.

कंगना म्हणाली की, क्रिती सेनॉनने यापूर्वी कोणते चित्रपट केले किंवा कोणते कपडे परिधान केले, यावर आपला आक्षेप नाही. मात्र, आपण केलेली पोस्ट रक्षाबंधनाच्या संदर्भात होती, असे तिने स्पष्ट केले. राहुल गांधींच्या पोस्टमध्ये रक्षाबंधनाचा उल्लेख का करण्यात आला नाही, असा सवालही तिने उपस्थित केला.

हेही वाचा –  चाकणच्या विकासाला वेग; ३१ ऑगस्टपर्यंत खड्डे बुजविण्याचे आदेश, १०० सुरक्षा जवानांची नियुक्ती

तसेच राहुल गांधींच्या विचारांमध्येच गोंधळ असल्याची टीका करत, ‘सनातनवर हल्ला करणे एवढाच त्यांचा अजेंडा आहे’, असे कंगनाने म्हटले.

क्रिती सेनॉनची जाहिरात मागे घेण्यात आल्याबाबत बोलताना कंगनाने केवळ पोशाख हा मुद्दा नसल्याचे सांगितले. रक्षाबंधनाच्या पारंपरिक वातावरणातील पूजेची तयारी, गंध, अक्षता, फुले, दिवा, टिळा आणि पारंपरिक खाद्यपदार्थ यांसारख्या बाबी जाहिरातीत दिसल्या नसल्याचा तिने आक्षेप घेतला.

या जाहिरातीमुळे आपणच नव्हे, तर हिंदू समाजातील अनेक लोक दुखावल्याचा दावा कंगनाने केला. हिंदू संस्कृती पुसण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत कंपनीने जाहिरात मागे घेतली, ते योग्य झाले, असेही तिने म्हटले.

या संपूर्ण प्रकरणावरून कंगना रणौतने राहुल गांधींच्या विचारसरणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तिच्या या वक्तव्यामुळे क्रिती सेनॉनच्या जाहिरातीवरून सुरू झालेला वाद पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button