आरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीमुंबई

पचन सुधारण्यासाठी, बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी त्रिफळा चुर्णाचे सेवन

त्रिफळा चुर्णाचे सेवन केल्यामुळे आरोग्य निरोगी राहाण्यास मदत

मुंबई : आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आणि खाण्या पिण्याच्या सवयींमुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. जास्त प्रमाणात जंक फूडचे सेवन केल्यामुळे तुम्हाला अनेक समस्या होऊ शकतात. जास्त प्रमाणात तेलकट आणि जंक फूड खाल्ल्यामुळे तुम्हाला पोटदुखी, बद्धकोष्ठता, अॅसिडिटी सारख्या अनेक समस्या होऊ शकतात. पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी मार्केटमध्ये अनेक औषध उपलब्ध आहेत. पंरतु या औषधांचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. आयुर्वेदानुसार, पचन सुधारण्यासाठी आणि बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी तुम्ही त्रिफळा चुर्णाचे सेवन करू शकता.

आयुर्वेदानुसार, त्रिफळा चुर्ण खाण्याचे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. त्रिफळा चुर्णाचे सेवन केल्यामुळे तुमच्या पोटाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. त्यासोबतच तुम्हाला जर अॅसिडिटी किंवा अपचनाची समस्या दूर होण्यास मदत होते. परंतु कोणत्याही गोष्टीचे अतिसेवन केल्यास तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. जास्त प्रमाणात त्रिफळा चुर्ण खाल्ल्यामुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. चला तर जाणून घेऊया जास्त प्रमाणात त्रिफळाचे सेवन केल्यामुळे तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतात.

हेही वाचा –  विद्यार्थी खेळाडूंचे प्रस्ताव राज्य बोर्डाने मागवले

त्रिफळा पावडरमध्ये रेचक गुणधर्म असतात, ज्यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो, परंतु त्रिफळा चुर्णाचे जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळे पोटात जळजळ निर्माण होऊ शकते. ज्या लोकांची पचनशक्ती कमकुवत असते अशा लोकांना त्रिफळा चुर्णामुळे अनेक समस्या होऊ शकतात. जास्त प्रमाणात त्रिफला खाल्ल्यामुळे पोटदुखी, पोट फुगणे आणि अतिसार यांच्या सारखे लक्षणे दिसून येतात. त्रिफळा चुर्णाचे जास्त सेवन केल्याने अतिसार होऊ शकतो त्याचे मुख्य कारण म्हणजे त्रिफळा चुर्ण तुमच्या आतड्यांना उत्तेजित करते, ज्यामुळे आतड्यांची हालचाल वाढते.

अतिसारामुळे तुमच्या शरीरातील डिहायड्रेशन आणि इलेक्ट्रोलाइट असंतुलन होऊ शकते, म्हणून त्रिफळा पावडर घेताना योग्य प्रमाण घेणे महत्वाचे आहे. काही लोकांना त्रिफळा चुर्णची अ‍ॅलर्जी असू शकते. त्वचेवर पुरळ, खाज सुटणे, सूज येणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे हे सर्व अ‍ॅलर्जीचे लक्षण आहेत. त्रिफळा चुर्ण खाल्ल्यानंतर तुम्हाला अ‍ॅलर्जीची लक्षणे दिसली तर तुम्ही ते ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा. गर्भधारणेदरम्यान आणि स्तनपान करताना त्रिफळा चुर्णाचे सेवन करणे टाळावे, कारण त्यात असे अनेक घटक असतात ज्यामुळे गर्भात किंवा आईच्या दुधात जाऊ शकतात. जर तुम्ही गर्भवती असाल किंवा स्तनपान करत असाल तर त्रिफळा चुर्ण घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

त्रिफळा चुर्ण खाण्याचे फायदे :

त्रिफळा चूर्णामध्ये अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे, हृदयविकाराच्या काही आजारांपासून संरक्षण मिळते. त्रिफळा चूर्णामुळे पोट साफ होते आणि बद्धकोष्ठता दूर होते. त्रिफळा चूर्णामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. त्रिफळा चूर्णामध्ये भरपूर अँटिऑक्सिडंट असतात ज्यामुळे त्वचा चांगली राहते. त्रिफळा चूर्णामुळे आंखींची समस्या दूर होते. त्रिफळा चूर्ण खाल्ल्यामुळे जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे तुमची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. त्रिफळा चूर्ण मधुमेह आणि हृदयविकार असलेल्या रूग्णांसाठी फायदेशीर ठरते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button