Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारण

‘आप’ला सर्वात मोठा धक्का! माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव

Delhi Election 2025 | दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे. भाजपाची २७ वर्षांनी सत्ता येणार हे निश्चित झालं आहे. आम आदमी पक्षाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. आम आदमी पक्षाचे मुख्य नेते आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. भाजपचे परवेश प्रवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर मात केली. अरविंद केजरीवाल यांचा जवळपास १२०० मतांनी पराभव झाला आहे. याआधीच आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही पराभवाचा समना करावा लागला आहे.

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला आहे. भाजपच्या परवेश वर्मा यांनी त्यांचा १२०० मतांनी पराभव केला आहे. केजरीवालांसारख्या राष्ट्रीय नेत्याचा पराभव करुन परवेश वर्मा हे जायंट किलर ठरले आहेत. अरविंद केजरीवाल हे नवी दिल्ली मतदारसंघातून ते रिंगणात उतरले होते. याठिकाणी त्यांच्यासमोर भाजपच्या परवेश वर्मा आणि काँग्रेसच्या संदीप दिक्षीत यांचे आव्हान होते.

हेही वाचा  :  भिमाशंकर विकास आराखड्यातील कामे दर्जेदार करा; उपमुख्यमंत्री अजित पवार

अरविंद केजरीवाल यांना १० व्या फेरीपर्यंत एकूण २०,१९० मते मिळाली होती. तर प्रवेश वर्मा यांना २२,०३४ मते मिळाली होती. प्रवेश वर्मा हे अरविंद केजरीवाल यांच्यापेक्षा १८४४ मतांनी आघाडीवर होते. तर तिसऱ्या नंबरवर संदीप दीक्षित आले आहे त्यांना ३५०३ मते मिळाली आहेत. सुरुवाती पासूनच अरविंद केजरीवाल प्रवेश वर्मा यांच्या मागे होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button