वाल्मिक कराड याचे व्हिडीओ का पाहातो अशी विचारणा करत तरुणाला मारहाण करण्यात आली
कृष्णा आंधळेच्या मित्रांनी स्टेटसला त्याचा फोटो ठेवला...
![Valmik Karad, thought, youth, hit, hit, Krishna is blind,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/karad-2-780x470.jpg)
बीड : बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे. वाल्मिक कराडचे व्हिडीओ का पाहातो? म्हणत तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अशोक मोहिते असं मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. अशोक मोहिते या तरुणाला बीड जिल्ह्याच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकराणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्या मित्रांनी मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी सात आरोपींना अटक केलं आहे, मात्र कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
कृष्णा आंधळेचं स्टेटस
आज कृष्णा आंधळे याचा वाढदिवस आहे. आंधळेच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या मित्रांनी आपल्या व्हॉट्अॅपला कृष्णा आंधळेचा फोटो स्टेटस ठेवला होता. वैजनाथ बांगर, अभिषेक सानप नावाच्या कृष्णा आंधळेच्या मित्रांनी स्टेटसला त्याचा फोटो ठेवला होता. याच दरम्यान वाल्मिक कराडचे व्हिडीओ पाहात असलेल्या अशोक मोहिते या तरुणाला मारहाण करण्यात आली आहे. वाल्मिक कराड याचे व्हिडीओ का पाहातो अशी विचारणा करत तरुणाला मारहाण करण्यात आली आहे.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमध्ये हाऊसिंग सोसायटी सदस्यांनी गिरवले कायद्याचे धडे!
कृष्णा आंधळे फरार
काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली. वातावरण चांगलंच तापलं. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे, तसेच एसआयटी देखील स्थापण करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये, तो फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. वाल्मिक कराड याच्यावर देखील मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान आज कृष्णा आंधळेच्या मित्रांनी तरुणाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. अशोक मोहिते याला मारहाण करण्यात आली आहे.