Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये हाऊसिंग सोसायटी सदस्यांनी गिरवले कायद्याचे धडे!

गृहनिर्माण सोसायटी कायदा जागृती: हाऊसिंग सोसायटी महासंघाच्या पुढाकारातून प्रशिक्षण

पिंपरी- चिंचवड : गृहनिर्माण संस्था, किचकट प्रक्रिया, नव्या अटी शर्ती नवे बदल यांची माहिती गृहनिर्माण संस्था हाउसिंग सोसायटी सदस्य यांना व्हावी या विधायक हेतूने पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी महासंघाच्या पुढाकारातून प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिरातून हाउसिंग सोसायटीच्या सदस्यांनी कायद्याचे धडे गिरवले.

सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या व्यवस्थापकीय समित्यांचे चे सदस्य तसेच व्यवस्थापक महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदीनुसार प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे. ही बाब लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी महासंघाने पुढाकार घेतला. १ व २ फेब्रुवारी रोजी हॉटेल एंबियन्स, वाकड येथे १२० सोसायटयांचे १६० कार्यकारिणी सदस्य, व्यवस्थापकांनी सहभाग नोंदविला.

हेही वाचा  :  स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण; इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत दिली माहिती 

ॲड. सत्या मुळे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. ॲड कणाद लहाने, ॲड अंजली कलंत्रे , चार्टर्ड अकाउंट्ंट विनायक दौंडकर, काशीनाथ दंडवते, सहकार निवडणूक अधिकारी संजय नेवसे यांनी प्रशिक्षणार्थिना मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फेडरेशनचे सर्व कमिटी सदस्य, कस्पटे वस्ती ज्येष्ठ नागरिक संघाच्या रिटा वासवानी, अरुणा लकडे, जयश्री निकूंभ यांचे सहकार्य लाभले. माजी नगरसेवक संदीप कस्पटे यांनी सहाय्य केले. पिंपरी चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष दत्तात्रय देशमुख यांनी आभार मानले.

ससायटी कामकाज आणि कायदा मार्गदर्शन..

दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात हाऊसिंग सोसाट्यांच्या कामकाज कायद्याच्या चौकटीत राहून कसे पार पाडावे या संबंधी प्रशिक्षण देण्यात आले. सोसायटयांची खाते पुस्तके-रेकॉर्ड कसे ठेवायचे, मासिक सभा व अन्य सभा यांचे कामकाज कसे चालवायचे, शेअर सर्टिफिकेट्स, सोसायटी बाय लॉंज्, मेंटेनन्स शुल्क, निधी संकलन व गुंतवणूक इत्यादी अनेक विषयांवर तज्ञ मंडळीनी प्रशिक्षण दिले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button