Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

‘बांगलादेशी नागरिक आढळल्यास पोलिसांना कळवा’; मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे :  आपल्या परिसरात बांगलादेशी नागरिकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी जबाबदारी झटकून चालणार नाही. एखादा फेरीवाला, मजूर बांगलादेशी असल्याचा संशय आल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी. पुण्यातील लोकसंखा, विस्तार झपाट्याने वाढत आहे. त्याअनुषंगाने शहरातील समस्या वाढत आहेत, असे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

पुणे पोलिसांच्या पश्चिम प्रादेशिक विभागाकडून विविध गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला तीन कोटी ८४ लाख रुपयांचा ऐवज ३०० तक्रारदारांना परत करण्यात आला. या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी मुंबई-पुणे शहरांतील बांगलादेशी घुसखोर, त्यांच्या समस्येबाबत सूचक भाष्य केले. या वेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, संभाजी कदम, स्मार्तना पाटील यावेळी उपस्थित होते.

बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कारवाईचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. घुसखोरांना शोधून त्यांची मायदेशी पाठवणे, घुसखोरांना रोखण्यासाठी केंद्र शासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. पुणे-मुंबईतील बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात येत आहे. याबाबतचे आदेश फडणवीस यांनी दिले आहेत, अशी माहिती पाटील यांनी दिली.

हेही वाचा –  काळजी घ्या!! पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोमच्या रुग्णसंख्येत वाढ

पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, “विविध गुन्ह्यांत चोरट्यांकडून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशाने तक्रारदारांना परत देण्यात येतो. या बाबतची प्रक्रिया त्वरीत होण्यासाठी न्यायालयीन कामकाजात पाठपुरावा करणे गरजेचे आहे. हा ऐवज एक महिन्याच्या आत तक्रारदारांना परत करण्यात यावा. ही पोलिसांची जबाबदारी आहे. या बाबतचे आदेश शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत.’

पुणे शहर जगातील चौथे कोंडीचे शहर आहे, असे एका संस्थेच्या अहवालात नमूद केले आहे. पुण्यात वाहतूक कोंडी होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीचा वेग वाढला आहे. अतिक्रमणांवर कारवाई, रस्त्यांची दुरस्ती, तसेच वाहतूक विषयक सुधारणेसाठी उपाययोजना केल्याने वाहतूक गतिमान झाली आहे, असा दावा पोलीस आयुक्तांनी केला.

लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे आहे. त्यामुळे पोलीस दलातील पायाभूत सुविधा, मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी शासनासकडून प्रयत्न करण्यात येत आहे. पुणे पोलीस दलाला येत्या काही महिन्यांत एक हजार पोलीस शिपाई उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असे मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button