Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विवाह जमविण्यासाठी तडजोड महत्वाची; माजी आमदार विलास लांडे

तेली समाजाच्या वतीने आयोजित मोफत वधु - वर पालक परिचय मेळावा

पिंपरी-चिंचवड | आजच्या धावत्या युगात आपल्या मुला-मुलींसाठी त्या-त्या क्षेत्रातील वधू-वर शोधणे कठीण काम झालेले आहे. सध्याच्या काळात उच्चशिक्षित मुलींची संख्या समाजात जास्त असून, त्यांच्या वराबाबतच्या अपेक्षाही अवास्तव वाढत आहेत. विवाह जमविण्यासाठी तडजोड ही अतिशय महत्वाची बाब आहे, असे मत माजी आमदार विलास लांडे यांनी व्यक्त केले.

पिंपरी -चिंचवड शहर तेली समाजाच्या वतीने आयोजित मोफत वधु – वर पालक परिचय मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी विलास लांडे बोलत होते. यावेळी सुदूंबरे येथील श्री संताजी महाराज जगनाडे तेली संस्थेचे अध्यक्ष शिवदास उबाळे, मेळाव्याच्या अध्यक्षा, वाघोली गावच्या सरपंच वसुंधरा उबाळे, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, स्थायी समितीचे माजी सभापती अजित गव्हाणे, कामगार नेते सचिन लांडगे, ह.भ.प विशाल महाराज फुगे, पिंपरी-चिंचवड शहर तेली समाजाचे अध्यक्ष शिवराज शेलार, प्रदीप उबाळे, दिनेश उबाळे, सोमनाथ उबाळे, रंजना पिंगळे, अनिता गायकवाड, ज्योती जगनाडे, नेहा शेलार, नरेंद्र मेहेर, अविनाश चिलेकर, पोपट पिंगळे, बाळासाहेब शेलार, आकाश शिंदे, दत्तात्रय शेलार, राजश्री चिलेकर, दिलीप खोंड, बंडोपंत शेलार, विजयकुमार शिंदे, संतोष माकुडे, संदीप चिलेकर, प्रदीप बारमुख, रमेश भोज, घनश्याम वाळुंजकर, अनिल चौधरी आदी उपस्थित होते.

हेही वाचा     –    भविष्य वाचवायचे असेल तर पर्यावरण वाचविणे आवश्यक; राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन 

मेळाव्यात ८०० वर आणि ४५० वधुंनी नावनोंदणी केली.या प्रसंगी ५ ते ६ हजार समाजबांधव उपस्थित होते. कार्यक्रमात समाजात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल श्री.शिवदास उबाळे यांना समाजभुषण पुरस्काराने गौरविण्यात आले. संस्थेचे मुख्य सचिव संजय जगनाडे यांनी प्रास्ताविक केले.

मेळाव्याच्या अध्यक्षा सौ.वसुंधरा उबाळे यांचे अध्यक्षीय भाषण झाले. मनीषा काळे यांनी आभार मानले. मेळाव्याच्या नियोजनासाठी अनिता गायकवाड, नेहा शेलार, संगीता तेली, ज्योती तेली, कार्तिकी चाळेकर, शोभा वाव्हळ, मनीषा दिवटे, अनघा हाडके, नीलिमा कर्पे, पुष्पा शेलार, शारदा रत्नपारखी, सुगंधा राऊत, मनीषा धोत्रे, नंदा साखरे, सविता कर्पे, पूनम पवार, संगीता ढोरे, सीमा शेलार, वैशाली शेलार, अमृता रायकर, कल्पना शेजवळ, सविता रायकर, दिपाली हाडके, मंदा राऊत, पुष्पा शेलार, भारती घाटकर, मनीषा किरवे, दिलीप धोत्रे, सचिन काळे, संतोष साखरे, प्रवीण देशमाने, विजय महाडिक, सुनील वाव्हळ, गजानन रत्नपारखी, सारंग शिंदे, राजेश भोज, गणेश इंगळे, प्रकाश भगत, दिनेश दिवटे, राजेंद्र चौधरी, किरण कहाणे, शेखर कर्पे, शिवाजी अंबिके, विनीत राऊत, आकाश शिंदे, संदीप रायकर, गणेश जगनाडे, संतोष काळे, समर्थ शेलार, युवराज शेलार, मयूर चाळेकर, महेश देशमाने, रवींद्र हरकुळकर, राकेश शेलार, रोहित राऊत, संजय शेलार आदंींनी पुढाकार घेतला.

मुलगा अथवा मुलगी पाहण्यात जाणारा वेळ आणि खर्च याला फाटा द्यायचा असेल तर वधू-वर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून अधिकाधिक लग्न कशी जुळतील याचा विचार प्रामुख्याने करणे ही काळाची गरज आहे. यातून लग्न जमविण्याचा जटील प्रश्न सोडविण्यास मोठी मदत होईल.

– विलास लांडे, माजी आमदार.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button