Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘महाईन्यूज’ With Pimpri-Chinchwadkar : वाकड- दत्तमंदिर रोडने अखेर घेतला मोकळा श्वास ! 

पिंपरी-चिंचवडमधील सर्वांत मोठी अतिक्रमण कारवाई : सोसायटी फेडरेशन, सोसायटीधारकांच्या मागणीला यश

पिंपरी- चिंचवड । प्रतिनिधी 

वाकड-दत्तमंदिर (Wakad Datta Mandir Road ) काॅक्रीट रस्त्याचे काम अतिक्रमणांमुळे काम रखडले आहे. स्थानिक जागामालकांना महापालिकेने ९५ टक्के मोबदला दिला. परंतू, तेथील जागेवरचे अतिक्रमण काढले जात नव्हते. याबाबत ‘महाईन्यूज’ने स्थानिक सोसायटीधारकांच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवला. महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या आदेशाने अखेर अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली. रस्त्याच्या दुर्तफा असलेली पत्राशेड, आरसीसी बांधकाम अशी सरसकट अतिक्रमणे जमिनदोस्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरातील आतापर्यंतची सर्वात मोठी अतिक्रमण कारवाई वाकड- दत्तमंदिर रोडवर (Wakad Datta Mandir Road ) करण्यात आली. स्थानिक नागरिकांनी उभारलेली अनेक घरे 45 मीटर रस्त्यामध्ये बाधित झाली होती. ती घरेसुद्धा हटवण्यात आली. त्यामुळे या भागात प्रशासन आणि स्थानिक नागरिक असे तणावाचे वातावरण होते. मात्र, स्थानिक नागरिकांनी सामोपचाराने या कारवाईला सहकार्य केले असून, वादावादीचा प्रसंग उद्भवलेला नाही.

दरम्यान, याच रस्त्यावर पुण्यातील एका मोठ्या बांधकाम व्यावसायिक कंपनीचा प्रकल्प आहे. त्या प्रकल्पाचा काही भाग बाधित होत असतानाही त्यावर कारवाई केली नाही, असा काहीसा सूर अतिक्रमण कारवाई झालेल्या बाधित मालमत्ता धारकांचा आहे. त्यामुळे प्रशासनाने कारवाईमध्ये भेदभाव न करता निरपेक्ष कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

वाकड-दत्त मंदिर (Wakad Datta Mandir Road ) रस्त्याच्या प्रश्नावर ‘महाईन्यूज’ने सातत्याने आवाज उठवला आहे. शहरातील आघाडीच्या प्रसारमाध्यमांसोबत ‘महाईन्यूज’नेही महापालिका प्रशासनाला धारेवर धरले होते. तसेच रस्त्याचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी बातम्यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू होता. त्यामुळे सोसायटीधारकांमधून समाधान व्यक्त होत असून नागरिकांनी त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

सोसायटीधारकांचा एल्गार यशस्वी… 

वाकड-दत्तमंदिर रस्त्याच्या (Wakad Datta Mandir Road ) काँक्रीटीकरणाचे काम गेल्या चार वर्षांपासून संथ गतीने सुरु आहे. रस्त्यांचे केवळ ६० टक्के काम पुर्ण झाले आहे. महापालिकेने संबंधित जागामालकांना ९५ टक्के मोबदला दिला होता. महापालिकेकडून जागेचा मोबदला घेवूनही रस्त्यावर ताबा स्थानिक जागा मालकांनी सोडत नव्हते. त्यामुळे रस्त्याचे काम रखडले आहे. पर्यायाने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. स्थानिक सोसायटीधारकांना दररोज सायंकाळी वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. तेथील नागरिक हैराण झाले आहेत. अतिक्रमण काढण्यासाठी सोसायटी फेडरेशनकडून आयुक्त, स्थापत्य विभाग, ‘ड’ क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे वारंवार पत्रव्यवहार करुनही अतिक्रमण काढले जात नव्हते. 

Impact of 'MahaeNews': Wakad-Dattamandir Road finally breathes a sigh of relief!
Impact of ‘MahaeNews’: Wakad-Dattamandir Road finally breathes a sigh of relief!

वाकड-दत्तमंदिर रस्ता होणार ४५ मीटर रुंद… 

महापालिकेने वाकड – दत्तमंदिर रस्ता (Wakad Datta Mandir Road ) ४५ मीटर रुंद होईल, असे सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात काही ठिकाणी ३० मीटर रुंदीचाच रस्ता वाहनचालकांना उपलब्ध करून दिला जात होता. त्यामुळे या भागातील एकूण २७ सोसायट्यांनी पालिका प्रशासनाकडे लेखी तक्रारी केल्या होत्या. वाकड-दत्तमंदिर रोड रुंदीकरणाबाबत स्थानिक सोसायटीधारकांनी आक्षेप घेतले होते. विकास आराखड्याप्रमाणे हा रस्ता ४५ मीटर होणे अपेक्षित आहे. प्रभाग क्रमांक २५ मध्ये असलेल्या वाकड- दत्तमंदिर रोडचे रुंदीकरण झाले पाहिजे. विकास आराखड्यानूसार पुर्ण होईल, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. 

Impact of 'MahaeNews': Wakad-Dattamandir Road finally breathes a sigh of relief!
Impact of ‘MahaeNews’: Wakad-Dattamandir Road finally breathes a sigh of relief!

वाकड-दत्तमंदिर रस्त्यावर अतिक्रमण केलेली सर्व पत्राशेड, घरे, दुकाने, व्यावसायिक गाळे, हाॅस्पीटल, माॅल यांना मागील आठवड्यात चार दिवस स्पीकरद्वारे अतिक्रमण कारवाई होणार असल्याची पुर्वकल्पना देण्यात आली. त्या सगळ्यांना रितसर नोटीस बजावण्यात आली. अतिक्रमण पथकाद्वारे कारवाई करुन सगळी अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली आहेत.
– मनोज लोणकर, उपायुक्त, अतिक्रमण विभाग, महापालिका. 

Impact of 'MahaeNews': Wakad-Dattamandir Road finally breathes a sigh of relief!
Impact of ‘MahaeNews’: Wakad-Dattamandir Road finally breathes a sigh of relief!
Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button