जेजुरी-मोरगाव रस्त्यावर भीषण अपघात; ८ जणांचा दुदैवी मृत्यू

पुणे | पुण्यातील जेजुरी-मोरगाव रस्त्यावर भीषण कार अपघात झाला आहे. स्वीफ्ट आणि पीकअपची धडक झाली. या अपघातामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांशिवाय पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले असून, चौघांची प्रकृती गंभीर आहे. या अपघातात ७ पुरुष आणि एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर दोन मुलांसह पाच जण जखमी झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जेजुरी मोरगाव रस्त्यावर संध्याकाळी ६.४५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. किर्लोस्कर कंपनीच्या जवळ श्रीराम धाबा आहे. या ढाब्याचे मालक वायसे हे त्यांच्या ढाब्यासाठी फ्रिज मागवले होते. संध्याकाळी एक पिकअप टेम्पो डिलिव्हरी देण्यासाठी आला.
हेही वाचा : राज्यात पुढील ५ दिवस मुसळधार पाऊस; IMD चा अंदाज काय?
पिकअप व्हॅनमधून फ्रिज खाली उतरून घेतले जात होते. यावेळी ढाब्यात काम करणारे कामगार आणि मालक मदत करत होते. पण अचानक इंदापूर मार्गाने एक मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर सुसाट वेगात आली. काही कळायच्या आता तिने फ्रिज उतरवणाऱ्या ८ जणांना धडक दिली. त्यानंतर कार ही टेम्पोला जाऊन धडक दिली.
हा अपघात इतका भीषण होता की, टेप्पो दूर अंतरावर फेकला गेला आणि पलटी झाला. तर कारचाही चक्काचूर झाला. कारमधील चालकाचा जागेवरच मृत्यू झाला. एवढंच नाहीतर ढाब्याजवळ उभी असलेल्या आणखी एका कारचं अपघातात मोठं नुकसान झालं. या अपघातात ७ पुरुष आणि एका महिलेचा मृत्यू झाला. मृतांचे मृतदेह हे शवविच्छेदनासाठी जेजुरी ग्रामीण रुग्णालय इथं पाठवण्यात आले आहे. तर एक पुरुष हॉस्पिटल एक महिला आणि २ लहान मुलांना शांताई हॉस्पिटल जेजुरी हे उपचारासाठी दाखल केलं आहे.