आरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मधुमेहींनी हिवाळ्यात खावे ‘हे’ 5 पदार्थ, वाढणार नाही रक्तातील साखर

हिवाळ्यात मधुमेहींनी पुढील पदार्थांचे सेवन करणे आरोग्यदायी

महाराष्ट्र : मधुमेही रुग्णांना नेहमीच त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची भीती असते. यामुळे अनेक लोक काही पदार्थ खाणे टाळतात. मधुमेहाप्रमाणेच आहाराचा थेट परिणाम तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर होतो. म्हणूनच, आपण आपल्या आहाराकडे खास लक्ष देणं गरजेचे असते. मधुमेहींना काही पदार्थ न खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. तज्ज्ञांच्या मते हिवाळ्यात मधुमेहींनी पुढील पदार्थांचे सेवन करणे आरोग्यदायी ठरते.

नाचणीचे पदार्थ
नाचणीमध्ये अनेक पोषक घटक असतात. जे शरीराला निरोगी ठेवतात आणि मधुमेहींसाठी देखील फायदेशीर आहे. तसेच कॅल्शियमची कमतरता पूर्ण करून शरीराला ताकद मिळते. हे कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले धान्य आहे जे रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढण्यापासून प्रतिबंधित करते.

आवळा रस
आवळा हे फळ हिवाळ्यात सहज मिळते. व्हिटॅमिन सीने समृद्ध असलेल्या या फळाचा रस प्यायल्याने मधुमेहाच्या रुग्णांना फायदा होऊ शकतो. तुम्ही आवळा चटणी, सुका आवळा किंवा कच्चा आवळा देखील खाऊ शकता

ज्वारीच्या भाकरी
मधुमेहींसाठी बाजरी आणि ज्वारीची भाकर उत्तम आहे. याचे सेवन केल्याने साखरेची पातळी नियंत्रणात राहते. मधुमेहींनी गव्हाएवजी ज्वारी किंवा बाजरीची भाकर खावी.

कच्ची हळद
हिवाळ्यात कच्ची हळद खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत मिळते. कच्ची हळद तुम्ही लोणची, भाजी किंवा चटणीच्या स्वरूपात खाऊ शकता.

कडुलिंब आणि कारल्याचा रस
शरीरातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कडुलिंब आणि तिखट या दोन कडू पदार्थांचे सेवन फायदेशीर मानले जाते. कडुलिंब आणि कारल्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आढळतात. जे शरीरातील अतिरिक्त ग्लुकोज कमी करतात. यामुळे मधुमेह नियंत्रणात राहते. कडुनिंब आणि कारले एकत्र बारीक करून रस बनवू शकता. हा रस प्यायल्याने तुमची रक्तातील साखरेची पातळी सहजपणे नियंत्रित राहील.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button