Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत घ्या हक्काचं घर! म्हाडा बांधणार २३९८ परवडणारी घरे, कधी निघणार लॉटरी?

Mumbai Mhada Lottery | मुंबईत स्वत:चे घरे घेण्याचे अनेकांचे स्वप्न असून या प्रयत्नात म्हाडाची मोठी मदत होते. म्हाडाने आतापर्यंत मुंबई शहर आणि उपनगरात म्हाडाच्या वसाहती आणि सदनिका बांधून शहरातील नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून दिली आहेत. आता पुन्हा म्हाडाने मुंबईत जवळपास २५०० घरे बांधण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली.

म्हाडातर्फे मुंबईतील गोरेगाव परिसरात २ हजार ३९८ घरे बांधण्यात येणार आहेत. २०२७ पर्यंत हे उद्दिष्ट गाठले जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी तीन विकासकांना काम देण्यात आले आहे.म्हाडातर्फे बांधण्यात येणारी ही घरे लॉटरीद्वारे विकली जाणार आहेत. त्यामुळे मुंबईत घर घेण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या प्रत्येक नागरिकांना या योजनेचा फायदा होणार आहे.

हेही वाचा     –      ठरलं! उद्या महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, ‘या’ नेत्यांची नावे चर्चेत! 

मुंबईतील गोरेगाव येथे बांधण्यात येणाऱ्या एकूण घरांची संख्या लक्षात घेता हा म्हाडासाठी मोठा प्रकल्प असेल. या प्रकल्पांतर्गत एकाच ठिकाणी अधिक घरे बांधली जाणार आहेत. मुंबईजवळील परवडणाऱ्या घरांच्या विक्रीला चालना देण्यासाठी म्हाडाने अनेक ठिकाणी माहिती केंद्रे उभारली आहेत. परवडणाऱ्या घरांचे प्रकल्प मुंबईजवळ विरार, ठाणे आणि कल्याण सारख्या भागात आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button