ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण
संजय राऊतांचे काँग्रेस- ठाकरे गटातील वादावर भाष्य
जागेसंदर्भात जे प्रश्न होते. त्याच्याबद्दल चर्चा,काँग्रेस पक्ष हा सामंजस्याची भूमिका घेणारा पक्ष
महाराष्ट्र : महाराष्ट्रात विधानसभेची रणधुमाळी सुरु आहे. अशात दोन्ही आघाड्यांच्या जागावाटपाचं अद्याप भिजत घोंगडं आहे. महाविकास आघाडीत तर जागा वाटपावरून सुरु असलेला वाद हा विकोपाला गेला आहे. विदर्भातील काही जागांवरून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात टोकाचे वाद झाले आहेत.
यावादावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेत जागेसंदर्भात जे प्रश्न होते. त्याच्याबद्दल चर्चा केली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची चर्चा झाली आहे. कॉंग्रेस हायकमांड आणि काँग्रेस पक्ष हा सामंजस्याची भूमिका घेणारा पक्ष आहे, असं संजय राऊत म्हणालेत.





