Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

गौरी लंकेश हत्याकांडातील आरोपी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल

मुंबई | पत्रकार गौरी लंकेश यांची २०१७ मध्ये बंगळुरूतील त्यांच्या राहत्या घराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी श्रीकांत पांगारकरला अटक करण्यात आली होती. पण 4 सप्टेंबर 2024 रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाने श्रीकांत पांगारकरला जामीन मंजूर केला. आता याच आरोपीने शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. श्रीकांत पांगारकरच्या पक्षप्रवेशानंतर राजकीय वर्तुळात आता विविध चर्चांनाही उधाण आलं आहे.

शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर यांच्या उपस्थितीत जालन्यात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. पक्षप्रवेशानंतर श्रीकांत पांगारकर याची लगेच जालना विधानसभा प्रमुखपदी नियुक्तीही करण्यात आली आहे. श्रीकांत पांगारकरच्या पक्षप्रवेशाबाबत शिवसेना नेते अर्जून खोतकर म्हणाले, श्रीकांत पांगारकर हे माजी शिवसैनिक आहेत. ते परत पक्षात आले आहेत. त्यांची जालना विधानसभा मतदारसंघ प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीकांत पांगारकर हे जालना विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत. पण महायुतीचे जागावाटप अद्याप झालेलं नाही.त्यामुळे याबाबत सध्या काही बोलता येणार नाही.

हेही वाचा     –      ‘शाहांसोबत चर्चा, तिढा सुटला, लवकरच अंतिम निर्णय’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

श्रीकांत पांगारकर कोण आहेत?

जालन्यातील श्रीकांत पांगारकर हा शिवसेनेचा माजी नगरसेवक असला तरी त्याचे वडील जगन्नाथ पांगारकर हे भाजपाचे माजी नगरसेवक होते. भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जायचे. साधारणत: २० ते २५ वर्षांपूर्वी जालन्यात शिवसेनेचा जोमात होती. त्यावेळी जगन्नाथ पांगारकर यांचा मुलगा श्रीकांतने शिवसेनेत प्रवेश केला. जालन्यात पांगारकर यांचे स्वस्त दरात धान्य व रॉकेलचा व्यवसाय होता. २००१ ते २०१० अशी सलग १० वर्षे तो शिवसेनेचा नगरसेवक होता. २०११ मध्ये त्याने शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली. शिवसेनेतून बाहेर पडल्यावर श्रीकांत पांगारकर हिंदू जनजागृती समितीचा पदाधिकारी म्हणून काम करु लागला. तो केदारनाथमधील जलप्रलयानंतर तिथे मदतकार्यासाठीदेखील गेला होता, अशी माहिती आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button