Breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारण

To The Point : पिंपरी विधानसभा : ‘धंदा-पाणी’वाले नव्हे; तर ‘निष्ठावंत’ आण्णा बनसोडेंनाच संधी!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सूचक संदेश : इच्छुकांचे वकीलपत्र घेतलेल्यांचा अक्षरश: हिरमोड  

पिंपरी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक आणि निष्ठावंत आमदार आण्णा बनसोडे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मतदार संघामध्ये जोरदार पकड निर्माण केली आहे. त्यासाठी अजित पवार यांच्या मध्यवर्ती ‘वॉर रुम’मधील यंत्रणा कामाला लागली आहे. त्यामुळेच बनसोडे यांच्या ‘ब्रँडिंग’मध्ये गुलाबी रंगाची छटा प्रामुख्याने दिसते. 

महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागावाटपामध्ये पिंपरी विधानसभा मतदार संघ कोणाच्या वाट्याला जाणार याबाबत अद्याप एकमत झालेले नाही. मात्र, या मतदार संघातून इच्छुकांची संख्या मोठी आहे. महायुतीमध्ये भाजपा आणि आरपीआयच्या स्थानिक नेत्यांनी या मतदार संघावर दावा केला आहे. तसेच, महाविकास आघाडीतील इच्छुक असलेल्या नेत्यांकडून आण्णा बनसोडे यांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारीला ‘कात्री’ लावण्यासाठी षडयंत्र रचले जात आहे. त्यासाठी महापालिकेतील ठेकेदार, व्यापारी, व्यावसायिक यांची ‘युती’ झाली असून, त्यातून अजित पवार यांच्याकडे विशिष्ट इच्छुकांची शिष्टाई करण्यासाठी बारामती-पुणे- मुंबई अशी वारी केली जात आहे. 

याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून, पिंपरी राखीव विधानसभा मतदारसंघातून आमदार अण्णा बनसोडे यांना सोडून दुसरे कोणालाही उमेदवारी द्या, अशी मागणी बारामती येथे निमंत्रीत केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकित करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि युवा नेते पार्थ पवार यांच्या प्रमुख उपस्थित होते, असे सांगितले जाते. मात्र, अजितदादा पवार यांनी या विषयावर बोलताना अद्याप जागा वाटपाची चर्चा बाकी आहे. पुढचे तीन दिवस त्यासाठी महायुतीचे नेते एकत्र बसणार आहेत, असा ‘गहू तेव्हा पोळ्या…’  अशी भूमिका घेतली. त्यामुळे वकीलपत्र घेवून गेलेल्या स्थानिक नेत्यांचा हिरमोड झाला आहे. 

इच्छुकांच्या अस्वस्थतेचे ‘हे’ आहे कारण…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पिंपरी-चिंचवडचा दौरा केला. या संपूर्ण दौऱ्यामध्ये आमदार आण्णा बनसोडे त्यांच्या सोबत आणि व्यासपीठावर पहिल्या रांगेत उपमुख्यमंत्र्यांच्या शेजारी होते. किंबहुना, पिंपरी विधानसभा मतदार संघातील ‘टर्निंग पॉईंट’ असलेल्या बोपखेल पुलाचा प्रश्न कायमस्वरुपी सुटला. बनसोडे यांच्या पुढाकाराने या पुलाचे काम पूर्ण झाले आणि आज अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण झाले. निवडणुकीच्या तोंडवर या कार्यक्रमाचे ‘पॉलिटिकल मायलेज’ आमदार बनसोडे यांना होणार आहे. किमान २० ते २५ हजार मतांचा ‘बेनिफीट’ निश्चित झाल्यामुळे आमदार बनसोडे विरोधकांची अस्वस्थता वाढली. त्यामुळे ‘ फेक नॅरेटिव्ह’द्वारे बनसोडे यांना ‘टार्गेट’ करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. विशेष म्हणजे, अजित पवार यांच्या प्रत्येक राजकीय भूमिकेत ‘सावली’ सारखे सोबत असणारे आण्णा बनसोडे यांना दोन महिन्यांपूर्वीच कामाला लागा, अशा सूचना दिल्या आहेत, असे राजकीय जाणकार सांगतात.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button