पद्मश्री ना. धों. महानोर यांनी शेतकरी जीवन मांडले; काशिनाथ नखाते
![Kashinath Nakhate said that Padmashri Na Dhon Mahanor presented the life of a farmer](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/09/Kashinath-Nakhate-780x470.jpg)
पिंपरी | पळसखेडचे कवी ना.धो. महानोर यांची रानातली कविता प्रसिद्ध झाल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आले . या शेताने लळा लाविला असा की सुख दुःखाला परस्परांशी हसलो रडलो आता तर हा जीवच अवघा असा जखडला असे शेतकऱ्यांचे जीवन आणि त्यांचे अनेक पैलू ना.धो.यांनी मांडले असे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले.
कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ ,घरेलु कामगार महासंघातर्फे आज ना. धो. महानोर यांचे जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
हेही वाचा – महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान; म्हणाले..
यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, उपाध्यक्ष राजेश माने, ओमप्रकाश मोरया, कृष्णा कुमार, अनिता मोरे, सुरेखा माने, देवीलाल, अनिल चव्हाण, सहदेव होनमाने, सलीम डांगे, हरि भोई, मनोज यादव, आदि उपस्थित होते.
रानकवी ,गीतकार म्हणून ते प्रसिद्ध होते तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव आणि शरदचंद्र पवार यांचेशी जवळचे नाते होते त्या माध्यमातून आमदार पद मिळाले त्यात ही त्यांनी शेतकरी व्यथा मांडून सोडवल्या पुढे त्यांना पद्मश्री ने सन्मानित करण्यात आले मात्र त्यांनी शेती ,गाव सोडले नाही ते नेहमी जमिनीवर राहिले, त्यांच्या अनेक कविता अनेक गीते महाराष्ट्र मध्ये प्रसिद्ध झाले जैत रे जैत, सर्जा, एक होता विदूषक, अबोली, मुक्ता अशा चित्रपटातले गाणे लोकप्रिय ठरले.