Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

स्वारगेट येथे लवकरच चार्जिंग स्टेशन, एसटी महामंडळाचा उपक्रम

पुणे :  एसटीच्या ताफ्यात इलेक्ट्रीक बसची संख्या वाढत असून, त्या तुलनेत चार्जिंग स्टेशनही असावेत, यादृष्टीने एसटी महामंडळाकडून ठिकठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारले जात आहेत.मात्र, पुण्यात ई-बसची संख्या अधिक असून, त्यात बाहेरगावाहून येणाऱ्या ई-बसचाही समावेश आहे. त्यामुळे स्वारगेट आगारात नव्याने ५० चार्जिंग पाइंट बसविण्यात येणार असून, येत्या सहा महिन्यांत हे काम पूर्ण होईल.

यामध्ये शिवाजीनगर आणि स्वारगेट आगारातील १२२, बाहेरील २८०, तर विभागीय कार्यालयात ७८ अशा एकूण ५०० इलेक्ट्रिक बसचे दिवसात चार्जिंग होणार आहे. यामुळे ई-शिवनेरी, शिवाई बसची चिंता मिटणार आहे. राज्याच्या सर्व विभागांतून पुण्यात येणार्‍या गाड्यांची संख्या अधिक आहे.याचा विचार करून एकाच ठिकाणी जास्तीत जास्त गाड्यांचे चार्जिंग व्हावे, या उद्देशाने स्वारगेट आगारात वर्कशॉपशेजारीच असलेल्या मोकळ्या जागेत ५० चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत.

त्यामुळे दिवसभरात ४२२ बसच्या चार्जिंगची सुविधा होणार आहे. एसटीच्या इंधनावर होणारा खर्च वाढला आहे. प्रत्येक महिन्याला महामंडळाच्या ताफ्यात नवीन ई-बस दाखल होत असल्यामुळे भविष्यातील गरज ओळखून ही चार्जिंग संख्या वाढविण्यात येत आहे.

हेही वाचा   –    पुण्यात पुन्हा ड्रिंक अँड ड्राईव्ह! पीकअप वाहनाची ४ ते ५ वाहनांना धडक; महिला ठार, दोघे जखमी 

‘एसटी’कडून भाडेतत्त्वावर घेतल्या जाणार्‍या इलेक्ट्रिक बसला चार्जिंग करण्यासाठी आगारात उच्च दाबाची वीजजोडणी लागणार आहे.त्यामुळे महामंडळाकडून राज्यभरातील सगळ्या विभाग नियंत्रकांना असे केंद्र उभारण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगण्यात आले असून, त्यात उच्च दाबाच्या वीज जोडणीसाठी विभागातील कनिष्ठ अभियंत्यांना आवश्यक सूचना करण्याचे आदेश दिले आहेत.

‘एसटी’कडून सध्या डिझेलवरील लालपरीऐवजी भाडेतत्त्वावर इलेक्ट्रिक बस खरेदीला प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात इलेक्ट्रिक गाड्यांची संख्या हळूहळू वाढणार आहे, जिल्ह्याच्या ठिकाणातून तर लालपरी कमी करून त्या तालुका पातळीवर धावतील.

परिणामी लांब पल्ल्याच्या प्रवासात लालपरीऐवजी इलेक्ट्रिक गाड्यांची संख्या जास्त असणार आहे. त्यामुळे महामार्गावरदेखील महामंडळाकडून चार्जिंग पाइंट उभारण्यात येणार आहेत.चार्जिंगसाठी ५० पाइंट बसविण्यात येणार आहेत. दिवसभरात ५०० गाड्यांच्या चार्जिंगची क्षमता आहे. त्याचे काम सुरू झाले आहे. लवकर ते पूर्ण करण्याचे नियोजन आहे.-प्रमोद नेहूल, विभाग नियंत्रक

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button