ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

महाविकास आघाडीकडून राज्यभरात ‘निषेध आंदोलन’

शरद पवार तोंडाला काळा मास्क लावून आंदोलनात सहभागी

पुणे : महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांच्या विरोधात महाविकास आघाडी मैदानात उतरली आहे. राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. पुण्यात शरद पवार यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं ‘निषेध आंदोलन’ सुरु आहे. तोंडाला काळा मास्क लावून शरद पवार या आंदोलनात सहभागी झाले आहेत. बदलापूरमधील शाळकरी मुलींच्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र हा बंद बेकायदेशीर असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं. त्यानंतर महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आला. मात्र महाविकास आघाडीकडून राज्यभरात ‘निषेध आंदोलन’ केलं जात आहे.

पुण्यात महाविकास आघाडीचं ‘मूक आंदोलन’
पुण्यात आज महाविकास आघाडीकडून मूक आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनात शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे सहभागी झाले आहेत. तोंडावर काळी पट्टी आणि हातात काळा झेंडा घेऊन मूक आंदोलन केलं जात आहे. पुणे स्टेशन परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं जात आहे. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं आवडतं ‘रघुपती राघव राजाराम’ हे भजन लावण्यात आलं आहे. सकाळी 10 वाजेपासून ते 11 वाजेपर्यंत एक तास हे आंदोलन केलं जात आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ पुणे पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button